Nashik Forest Department Recruitment 2012
हि जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अनु.क्रमांक
|
कार्यक्रम
|
दिनांक
| |
पासून
|
पर्यंत
| ||
१. | अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्याचा कालावधी | दि १०.९.२०१२ | दि १.१०.२०१२ |
२. | संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा कालावधी | दि १०.९.२०१२ | दि १.१०.२०१२ |
३. | ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक १.१०.२०१२ पर्यंत भरती प्रक्रिया शूल्क जमा केले असेल त्यांचासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी |
दि ३.१०.२०१२
|
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज ज्या पदासाठी भरणार आहे त्या पदाची पात्रता जाहीरातीमध्ये काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो व सहीचीscanned image स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. फॉर्म भरते वेळी आपल्याला फोटो व सहीची image upload करावी लागेल.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी “Apply Online” ह्या लिंक वर क्लीक करून अर्ज भरण्यास सुरवात करावी.
आपल्यास अर्ज करावयाचे पद निवडा. एक-एक करत आपल्यास विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर (Yes/No) पैकी योग्य पर्याय निवडा, संगणक प्रणाली तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे तुमची प्राथमिकपात्रता तपासेल.
जर प्राथमिक पात्रता चाचणीतआपण पात्र असाल तर ज्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे तो विभाग निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
आवश्यक माहिती भरल्यानंतर संगणक प्रणाली तुमचा लॉगीन आय.डी, पासवर्ड आणि एस.बी.आय चलन निर्माण करून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लॉगीन आय.डी, पासवर्ड दाखवेल आणि तुम्ही पुरवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS करेल (कृपया आपण आपला मोबाईल क्रमांक अचूकटाकावा जेणेकरून आपल्याला लॉगीन आय.डी आणि पास वर्ड ची माहिती आपल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस द्वारे प्राप्त होईल) . हा लॉगीन आय.डी म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक असेल.
तुमच्या लॉगीन आय.डी आणि पासवर्डची माहिती व चलन “ Print My Login Challan details” ह्या बटनवर क्लीक करून प्रिंट करावी.
चलन प्राप्त केल्या नंतर, कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या नजीकच्या भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जावे व चलनावर दर्शविलेले शुल्क बँकेत जमा करावे. बँक तुम्हाला शुल्क जमा केल्याची पोहोच देईल.
कृपया शुल्क,चलनावर दर्शवलेल्या अंतिम तारखेच्या आत भरा. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित ऑनलाईन अर्ज “Fill Application Form / अर्ज भरा ” ह्या लिंकवर क्लीक करून अर्ज पूर्ण भरावा.भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये खालील माहिती भरून अर्ज पूर्ण करणेआवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.
- वैयाक्तिक माहिती.
- आरक्षण बद्दलची माहिती.
- शैक्षणिकमाहिती.
- फोटो आणि सही अपलोड.
- कामाचा अनुभव.
- इतर आवश्यक माहिती
वरील सर्व माहिती अर्जामध्ये भरावी ती भरल्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्या माहिती साठी जतन करून ठेवावी.
ऑनलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्जाची प्रत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयाला किंवा एम.के.सी.एल.ला पाठविण्याची आवशकता नाही.
तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते. अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.
लेखी परीक्षेचे ओळख पत्र परिक्षापूर्वी तुमच्या लॉगीन मध्ये व वेबसाइट वर उपलब्ध राहिल. ह्यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
भरती प्रक्रिया शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रुपये २००/- आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना रुपये १००/- एवढे भारती प्रक्रिया शुल्क जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरावे लागेल.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net