Maharashtra HSC 2013 Exam New Timetable Fix
मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने विविध मागण्यांसाठी
पुकारलेला संप मागे घेतला जात असल्याचे आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था
महामंडळाने जाहीर केले. त्यामुळे बारावीची परीक्षा आता सुकर झाली आहे.
प्रलंबित
मागण्यांसाठी महामंडळाने गेल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार
टाकण्यासह परीक्षेसाठी संस्थेच्या इमारती, कर्मचारीवर्ग न देण्याचा निर्णय
घेतला होता. यासंदर्भात मुंबईत आज दुपारी महामंडळाची बैठक झाली. दोन तास
चाललेल्या बैठकीत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र,
तासाभराने महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल-पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा निरोप
आणि संप मागे घेतल्याचे महामंडळाने जाहीर केले.
महामंडळाचे सहकार्यवाह
डॉ. आर.पी. जोशी म्हणाले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भरतीवरील बंदी
उठवावी, गेल्या ९ वर्षांचे अनुदान त्वरित द्यावे, अनुदानासाठीचे जाचक निकष
बदलावेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अनुदान मिळावे आदी प्रमुख मागण्या
आम्ही केल्या होत्या. त्यासंदर्भात गेल्या आठवड्यात शासनाशी चर्चाही झाली.
मात्र
आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे आम्ही त्यांना तीन दिवसांचा
वेळ दिला होता. त्यानुसार, आज मुंबईत बैठक घेण्यात आली. शासनाकडून कोणतीही
प्रतिक्रिया न आल्याने संप कायम करण्याचा निर्णय आम्ही बैठकीत घेतला होता.
त्यानंतर, मुख्यमंत्र्यांचा चर्चेस तयार असल्याचा निरोप आला.
त्यामुळे
हा संप मागे घेतल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. शिक्षकांपाठोपाठ शिक्षण
संस्थांनीही संप पुकारल्याने बारावीच्या परीक्षेत अडचणींचा डोंगर उभा
राहिला होता. मात्र, दोघांनीही संप मागे घेतल्याने परीक्षा सुरळीत पार
पडणार आहेत आणि विद्यार्थ्यांचा संभ्रमही संपणार आहे. संस्थाचालकांनी संप
मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला
आहे. त्यांचे हित लक्षात घेऊन संस्थाचालकांनी घेतलेल्या निर्णयाचे मी
अभिनंदन करतो. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निश्चित एकत्र बसू.
चर्चेतून मार्ग काढता येतील. तसेच वर्षभर मेहनत करणार्या विद्यार्थ्यांना
अडचणीत आणणे योग्य नव्हते. हा विचार या सगळ्यांनी केला. या सर्वांचे
अभिनंदन करतो.
- राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री ■ २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या या परीक्षेस यंदा १२.९४ लाख विद्यार्थी बसणार आहेत.
■
सर्वाधिक ४.६७ लाख विद्यार्थी कला शाखेतील असल्याची माहिती राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी
दिली.
Source : Lokmat News Paper.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net