Bhagyashree HSC 90% Girl Needs Help..
बारावीच्या परीक्षेत ९0 टक्के गुण घेऊन तिने महाविद्यालयात पहिला क्रमांक पटकावला. भविष्यात तिला सीए व्हायचंय मात्र आपल्या गरीब मजूर आईवडिलांच्या आर्थिक परिस्थितीची तिला जाणीव आहे. त्यामुळेच पुढे शिक्षण घ्यायचे तरी कसे, असा यक्षप्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला आहे.
भाग्यश्री चौधरी असे या गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील कृष्णा हे मजुरी करतात. घरी पत्नी आणि भाग्यश्रीसह आणखी एक लहान मुलगी आहे. दोन्ही मुली, मुलगा नाही म्हणून कुठलीही खंत नाही. कृष्णाजींची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. मिळेल ते काम करून ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सध्या शिक्षण हे अतिशय महागडे झाले आहे. असे असतानाही त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. भाग्यश्री सदर मंगळवारी येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर प्राची नावाची लहान मुलगी महापालिकेच्या शाळेत असून सध्या ती आठव्या वर्गात शिकते. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही कृष्णाजी यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. मोठी मुलगी भाग्यश्री ही अभ्यासात हुशार. पहिल्या वर्गापासूनच तिने कधी पहिला नंबर सोडला नाही. दहावीच्या परीक्षेत तिने ८८ टकके गुण घेतले होते. तिच्याबरोबरच्या मुलींनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. तिलाही विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा होता. परंतु तिला आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची परिपूर्ण जाणीव होती.
'सायन्स फॅकल्टी' घेतली तर अभ्यासाचा खर्च वाढेल म्हणून तिने आपल्या इच्छेला आवर घातला आणि वाणिज्य शाखा निवडली. बारावीचे वर्ष असतानाही तिने कुठलीही ट्युशन लावली नाही. शाळेतील शिक्षकांवर विश्वास ठेवला. नियमित शाळा केली आणि घरीच अभ्यास केला. नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात तिने ९0 टक्के गुण घेत महाविद्यालयात पहिला क्रमांक पटकावला. शाळेपासून तर वस्तीतील नागरिकांपर्यंत सार्यांनीच तिचे कौतुक केले. मुलीने नाव कमावले म्हणून अजूनही कौतुक सुरूच आहे.९0 टक्के गुण घेऊन मुलीने आपले कर्तव्य पार पाडले. तिला सीए व्हायची इच्छा आहे. परंतु त्यासाठी पैसे लागणार? ते आणावे तरी कोठून? अशी चिंता भाग्यश्रीला सतावतेय. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे दहावीप्रमाणे याहीवेळी तिला आपली इच्छा मोडावी लागणार का? हा मुख्य प्रश्न आहे.
मदतीसाठी आवाहन
भाग्यश्री हुशार आहे. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे ती मागे राहू नये म्हणून तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी तिला सढळ हाताने मदत करावनी.
इच्छुकांनी भाग्यश्री चौधरी - बँक ऑफ इंडिया - खाते क्रमांक : ८७५७१0५१0000२१३ येथे मदत करावी. किंवा कृष्णा चौधरी मो. ९८६0३२८९३८ यावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net