Cast Validity Verification Compulsory For Engineering Admission 2013
In Maharashtra State DTE Admission for year 2013 - 2014 Cast Validity Certificate is Necessary | Cast Validity Certificate Download, Online Cast Validity System Pune, Cast Validity Certificate Compulsory For Admission 2013.
राज्यातील अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ओबीसीसह इतर जातीच्या उमेदवारांना जात पडताळणी सक्तीची केल्याने ८0 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश संकटात सापडले आहेत. समाजकल्याण व आदिवासी विभागाने जात पडताळणीचे दाखले वेळेत न दिल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग, डिप्लोमा) शाखेमध्ये प्रवेश घेताना जात पडताळणीचा दाखला नसल्यास त्याला सर्वसाधारणमधून प्रवेश देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विकास विभागाकडे जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचे अनेक दाखले प्रलंबित आहेत. राज्यामध्ये ३६६ अभियांत्रिकी महाविद्यालयांत एक लाख ५५ हजार जागा आहेत. त्यातील सुमारे ८0 हजार विद्यार्थी ओ.बी.सी.सह अन्य जातीचे आरक्षणाचा लाभ घेणार आहेत. मात्र जात पडताळणी सक्तीचा त्यांना फटका बसणार आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी १३ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी आहे तर १४ जूनला अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. तोपर्यंत जात पडताळणी होणार नाही. त्यामुळे जात पडताळणीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ओ.बी.सी.सह अन्य विद्यार्थ्याला अभियांत्रिकी प्रवेशासाठी गुणांची अट आहे. त्याने जात पडताळणीचा दाखला आणला नाही तर त्याच्यापेक्षा कमी गुण असणार्याला प्रवेश मिळेल व 'तो' विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडेल.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net