Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, July 28, 2013

Final Year Appeared Students Can't Appear For MPSC 2013 Exam

Final Year Appeared Students Can't Appear For MPSC 2013 Exam

स्वायत्त महाविद्यालये वगळता राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या अभियांत्रिकी अंतिम वर्षाचे निकाल खोळंबले आहेत. त्यातच सहायक अभियंत्यांची ९९७ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परीक्षा -२0१३ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अंतिम वर्षात शिकत असणारे विद्यार्थी पूर्वी या परीक्षेसाठी पात्र ठरत होते, आता मात्र पदवी मिळविणार्‍या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. अंतिम वर्षाचे निकाल खोळंबलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी सेवा परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (८0 पदे), जलसंपदा विभाग (७५९ पदे) आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ( १५८ पदे) या राज्य सरकारच्या तीन विभागात सहायक अभियंता (स्थापत्य) ही वर्ग दोनच्या अधिकार्‍यांची ९९७ पदे या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. आयोगाच्यावतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या राज्यातील चार केंद्रांवर होणार्‍या या परीक्षेसाठी १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
पदवीधरच ठरणार पात्र
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविणारेच विद्याथी या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पूर्वी परीक्षा देता येत होती. अशा विद्यार्थ्यांना मुलाखतीपूर्वी पदवी प्राप्त करणे बंधनकारक होते. यंदा अंतिम वर्षात उत्तीर्ण विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहेत. औरंगाबाद, पुणे, अमरावती, कराड आणि जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना सरकारने स्वायत्तता दिली आहे. परीक्षा घेणे,निकाल जाहीर करण्याचे अधिकार या महाविद्यालयांना आहेत. अंतिम वर्षाचे निकाल महिनाभरापूर्वीच जाहीर करण्यात आले,परंतु बहुतांश विद्यापीठांचे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचे निकाल सध्या खोळंबले आहेत. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..