Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, August 17, 2013

Employment Exchange Website Not Working? maharojgar. gov.in

Employment Exchange Website Not Working?  maharojgar. gov.in


एम्प्लायमेंट एक्सचेंज Website Closed | Maharashtra Employment Exchange Website | maharojgar. gov.in Not Working 

रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राची (एम्प्लायमेंट एक्सचेंज) जुनी वेबसाईट बंद करण्यात आल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना गेल्या नऊ महिन्यांपासून ऑनलाईन नोकर्‍या देणे बंद झाले आहे. उद्योग मंत्रालयाअंतर्गत जुनी बेवसाईट बंद करून नवीन बेवसाईट विकसित करण्याचे काम सुरू आहे. परिणामी सुशिक्षित युवकांना नोकर्‍या देण्याबाबत रोजगार व स्वयंरोजगार अधिकार्‍यांनीही हतबलता दाखविली आहे.रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय आधी एम्प्लायमेंट एक्सचेंज म्हणून ओळखले जात होते. या एक्सचेंजमध्ये सुशिक्षित युवकांनी आपल्या नावाची नोंदणी केली की, त्याला हमखास नोकरी मिळत असे. आता हे कार्यालय रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते आणि नावाप्रमाणेच हे खाते सध्या केवळ नावापुरतेच प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. या खात्याने गेल्या ८-१0 महिन्यात नोकरी देण्यासाठी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात अमरावती येथील जिल्हा कार्यालयासह विभागीय कार्यालयातून उपलब्ध आकडेवारी बेरोजगारांची थट्टा करणारी आहे. पाच वर्षांपूर्वी maharojgar. gov.in ही बेवसाईट सुरू करण्यात आली होती. आता ऑनलाईन नोंदणी व इतर सर्व कारभार  अत्याधुनिक करण्यासाठी नवीन वेबसाईट विकसित करण्यात येत आहे. नवीन वेबसाईटचा विकास पूर्ण होण्यापूर्वीच जुनी बेवसाईट बंद करण्यात आली. नवीन बेवसाईटवर केवळ नावांची नोंदणी करणे शक्य आहे. नावे नोंदविल्यानंतर त्यावर अधिसूचित पदांची संख्या, पात्र बेरोजगारांच्या नावाची शिफारस आणि त्यांची निवड आदी सर्व प्रक्रिया आतापर्यंत जुन्या बेवसाईटवरून केली जात होती. परंतु आता नोंदणी व्यतिरिक्त इतर सर्व कामकाज बंद पाडण्यात आलेले आहे. २४ हजारांची नोंदणी 

 नवीन वेबसाईटच्या माध्यमातून जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र, ई-महासेवा केंद्र, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी यंत्रणांच्या मार्फत बेरोजगार युवकांच्या नावांची नोंदणी करण्यात येत आहे. जानेवारी ते जुलै-२0१३ या कालावधीत अमरावती विभागातील २३ हजार ९५१ युवकांनी आपली नोंदणी केली आहे. त्यामध्ये अमरावती केंद्रात ६,४९१, यवतमाळ २,३४६, अकोला २,८१0, बुलडाणा १0,४४९, वाशिम १३९९ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील केंद्रात ४५६ युवकांची नोंदणी झाली आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..