Mumbai University Fees 40% increase ? ४0% शुल्कवाढ
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी महाविद्यालयातील फी-वाढ ही आता जवळपास निश्चित मानली जात आहे. जवळपास ४0 टक्के फी-वाढ करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या दुसर्या सत्रापासून ही वाढ लागू होईल. यासंदर्भात आठ दिवसांनंतर अंतिम बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम मसुदा सादर करण्यात आल्यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात येणार असल्याचे कळते.
विद्यापीठातील संलग्नित सगळ्या महाविद्यालयांत फीवाढीच्या प्रश्नाबाबत नुकतीच विद्यापीठातर्फे दोन शिक्षण शुल्क समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी या शिक्षण शुल्क समितीची महत्त्वाची बैठक विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत फी-वाढीच्या निर्णयाची घोषणा होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी युवा सेनेतर्फे या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली; तर युवा सेनेचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप करंडे, प्रदीप सावंत यांनी सरसकट सगळ्या महाविद्यालयांना फी-वाढ लागू करण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध करीत यासंदर्भात एक प्रस्ताव या बैठकीत सादर केल्याचे सांगण्यात आले आहे.
युवा सेनेचे दिलीप करंडे म्हणाले की, सरसकट सगळ्या महाविद्यालयांना फी-वाढ करण्यास मान्यता न देता, ज्या महाविद्यालयांनी काही निकष पूर्ण केले असतील त्या महाविद्यालयांनाच फी-वाढ करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. ती विनंती त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत यासंदर्भात अंतिम मसुदा तयार होणार आहे. ज्यात आम्ही दिलेल्या सूचनेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
■ महाविद्यालयातील प्राचार्य हा विद्यापीठ मान्यताप्राप्त असावा.
■ अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयांचे १00 टक्के शिक्षक हे विद्यापीठ मान्यताप्राप्त असावेत.
■ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन आवश्यक
■ विद्यापीठाचे सर्व शुल्क हे पूर्णपणे भरलेले असावे.
■ महाविद्यालयाने पेपर असेंसमेंट, मॉडरेशन करणे बंधनकारक असून, महाविद्यालयाने वेळोवेळी विद्यापीठासाठी शिक्षकवर्ग तत्काळ उपलब्ध करून दिलेल्या महाविद्यालयांचा यासाठी विचार करावा.
■ विद्यार्थ्यांना सर्व सेवासुविधा देणार्या महाविद्यालयांचाच विचार करण्यात यावा. आता रंगीत उत्तरपत्रिका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोंधळ थांबविण्यासाठी येत्या वर्षांपासून विद्यार्थ्यांना पांढर्या उत्तरपत्रिकेऐवजी रंगीत उत्तरपत्रिका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेण्यात आला आहे. ■ या निर्णयानुसार यंदाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ही रंगीत उत्तरपत्रिका देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ■ मुंबई विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दूरस्थ विभागातून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्याही हजारोंनी वाढली आहे. ■ पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षासाठी होणार्या परीक्षेला या रंगीत उत्तरपत्रिका देण्यात येणार आहेत.
■ विद्यापीठाच्या या निर्णयानुसार दूरस्थ विभागात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी ४0 पानांची गुलाबी उत्तरपत्रिका मिळणार असल्याचे सांगण्यात आले. ■ इतर महाविद्यालयातून परीक्षा बसणार्या विद्यार्थ्यांना ३२ पानांची निळ्य़ा रंगाची उत्तरपत्रिका मिळेल.
■ महाविद्यालयातून बसणार्या विद्यार्थ्यांचा पेपर हा ६0 गुणांचा असतो, दूरस्थ विभाग विद्यार्थ्यांचा पेपर हा १00 गुणांचा असतो.
■ अशावेळी या विद्यार्थ्यांना ३२ पानांचीच उत्तरपत्रिका देण्यात येत होती.
■ त्यामुळे बर्याचवेळा विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचीही तारांबळ उडत होती. म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाला गेल्या दोन महिन्यांपासून विभागप्रमुख मिळत नाही. या पदासाठी नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असणार्या नेट-सेटधारकाला डावलले जात असल्याचा आरोपही कर्मचारीवर्गाकडून करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे तत्कालीन विभागप्रमुख वामन केंद्रे यांची दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून या विभागाचे पद रिक्त आहे. मुंबई आणि नाट्यसृष्टीचे नाते तसे अतूट आहे. त्यातच नाट्यक्षेत्रातील एकाहून एक प्रसिद्ध आणि नामवंत व्यक्ती मुंबईत कार्यरत असतानाही प्रशासनाला या प्रमुखपदी नियुक्ती करण्यासाठी इतका वेळ लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन दिवसांत नावांची घोषणा
नवीन विभागप्रमुख पदाची निवड प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन ते तीन दिवसांत घोषणा केली जाईल, प्र-असे कुलगुरू डॉ. नरेशचंद्रन यांनी सांगितले.
विजय केंकरे की शफाअत खान? ■ या पदासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे आणि शफाअत खान यांच्यामध्ये जोरदार चुरस सुरू असल्यानेच ही नियुक्ती रखडत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
■ दरम्यान, या पदासाठी नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले अनेक जण इच्छुक असल्याची माहितीही हाती आली असून, विभागातील नेट-सेटधारकांना डावलून या दोघांचे नाव चर्चेत असल्याने या प्रकरणी वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कलिना कॅम्पसमध्ये युवा सेनेतर्फे शुल्कवाढीला विरोध करण्यात आला.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net