Tadoba National Park Online Booking 2013-2014 - www.maharashtratourism.gov.in
Tadoba
National Park,
वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा
व्याघ्रप्रकल्पामध्ये आता प्रवेशासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे. या
सेवेचे उद््घाटन वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू एच.
नकवी यांनी केले.
मागील महिन्यात ५ ऑगस्टला वनखाते व महाऑनलाईन यांच्यात
या संदर्भातील करार झाला. यावेळी महाऑनलाईनचे मुख्य अधिकारी सतनामसिंह,
ताडाबो अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.एम. रेड्डी, गोंदियाचे
मुख्य वनसंरक्षक गुरमे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या सेवेमुळे
देशविदेशातील पर्यटकांना आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन आरक्षण करता
येणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून केवळ ७0 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
तर, १५ टक्के अतिविशिष्ट कोटा ठेवण्यात आला आहे. सध्या ताडोबा व इतर सर्व
प्रकल्प ३0 सप्टेंबरपर्यंत बंद आहेत. या काळात केवळ दहा गाड्या सोडण्यात
येत आहेत. ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाले नसेल, तर पर्यटकांना
प्रवेशद्वारावर प्रवेश तिकीट मिळण्याची सुविधाही राहणार आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net