Amravati Clerical Exam Paper mistake By MKCL Recruitment Process
कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा देण्यास आलेल्या परीक्षार्थ्यांच्या हाती चक्क शिपाईपदाचा पेपर पडला. हा घोळ लक्षात आल्यानंतर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात परीक्षार्थ्यांनी दोन तास गोंधळ घातला. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. या प्रकरणाची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. दरम्यान झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या, अशी भूमिका परीक्षार्थ्यांनी घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
एमकेसीएलच्या चुकीमुळे अभियोग संचालनालयांतर्गत आज अमरावतीत कनिष्ठ लिपिक, टंकलेखक व शिपाई या तीन पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासह शहरातील १२ केंद्र निर्धारित करण्यात आले होते. तब्बल ५ हजार १0८ सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीसाठी अभियोग महासंचालनालयांतर्गत सरळसेवा भरती लेखी परीक्षा दिली. लिपिक-टंकलेखकासाठी ११ ते १२ पर्यंत तर शिपाईपदासाठी ११ ते ११.४५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. उत्तमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एकूण २४४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापैकी अनेक विद्यार्थी कनिष्ठ लिपिक-टंकलेखक पदासाठी परीक्षेला बसले होते.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net