scholarship 2013 maharashtra Website Not Opening, Application Closed?
Online Application Form scholarship 2013 Maharashtra Details
Important Links :
Important Links :
महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी मागासवर्गीय व दुर्बल घटकातील
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी समाज कल्याण
विभागाच्यावतीने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर जाहीर
करण्यात आली होती. मात्र १५ दिवस आधीच संकेतस्थळ बंद करण्यात आल्याने
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे. गेल्या आठ
दिवसांपासून समाज कल्याण व आदिवासी विभागाची दोन्ही संकेतस्थळे बंद आहेत.
समाज
कल्याण विभागाचे ई-महास्कॉलरशिप व आदिवासी विद्यार्थ्यांकरिता ई-ट्राईब या
संकेतस्थळावरुन ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे सुरू होते. विद्यार्थ्यांना
आधार कार्डची सक्ती केल्यामुळे शेकडो विद्यार्थी शासनाच्या
शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार होते. मात्र आता संकेतस्थळच बंद झाल्यामुळे
कागदपत्र मिळण्यास उशिर झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून
वंचित राहावे लागणार आहे.
एवढेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांच्या
अर्जामध्ये आधार कार्डची नोंद नसेल, त्यांचा अर्जसुद्धा स्वीकारू नये, अशा
सूचना शाळा, महाविद्यालयांना समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
आधार कार्डची नोंद नसलेले अर्ज स्वीकारून शिष्यवृत्ती न मिळाल्यास त्याला
स्वत: विद्यार्थी जबाबदार राहणार असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात येत
आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी खर्च करून अर्ज न भरलेला बरा, म्हणून अर्ज
भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. आजही अनेक गावांमध्ये आधार कॅम्प न पोहचल्याने
अनेक कुटुंब आधार कार्डापासून वंचित आहेत. जोपर्यंत शंभर टक्के लोकांपर्यंत
आधार कॅम्प पोहचत नाही, तोपर्यंत आधार कार्डची सक्ती करणे अयोग्य
असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गरीब विद्यार्थ्यांंच्या
शिक्षणाची पुंजी म्हणून ज्या शिष्यवृत्तीकडे पाहिले जाते. ती पूंजीच
हिरावल्याची भावना या निर्णयामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या
मनात तयार झाली आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना शासनाच्या समाज कल्याण व
आदिवासी विभागाच्या दोन्ही वेबसाईटवर आधार कार्ड असल्यास भरा, अशा स्पष्ट
सूचना दिल्या होत्या तसेच लाल स्टार दिलेली माहिती सक्तीची केली होती.
मात्र आधार कार्ड भरण्यासाठी लाल स्टार दिला नसल्याचे वेबसाईटवर दाखविण्यात
येत आहे.
समाज कल्याण विभागाने ही सक्ती करू नये, अशी पालकांची मागणी आहे.
Important Links :
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net