Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, November 30, 2013

Punjabrao Deshmukh, Mahatma Fule Krushi Vidyapith will Split 2013

Punjabrao Deshmukh, Mahatma Fule Krushi Vidyapith will Split 2013

राज्यातील डॉ. पंजाबराव देशमुख व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या दोन कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्याचे शासनाच्या विचाराधिन आहे. सप्टेंबर महिन्यात विभाजन समितीचे गठन करण्यात आले असून, शासनाने विद्यापीठ विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी डॉ.वाय.एस.पी. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला शासनाने पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
विभाजनाच्या पृष्ठभूमीवर या समितीने, ७ ऑक्टोबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देऊन कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शास्त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थी यांची मते जाणून घेतली. त्यावेळी पूर्व व पश्‍चिम विदर्भातील अधिकारी, विद्यार्थ्यांमध्ये मतभिन्नता दिसून आली; परंतु यातील बहुतांश अधिकारी, विद्यार्थ्यांनी विभाजनाऐवजी याच कृषी विद्यापीठाला बळकट करण्यावर जोर दिला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. थोरात यांच्यासह राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ.यू.एस. कदम यांची उपस्थिती होती.
या सुनावणीच्यावेळी डॉ.पंदेकृविचे माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल, डॉ. गोविंदराव भराड यांची उपस्थिती होती. सुरुवातीला डॉ. विजय माहोरकर यांनी कृषी विद्यापीठाचे विभाजन कसे तोट्याचे आहे, हे समितीच्या लक्षात आणून दिले. पूर्व विदर्भातील भात हे प्रमुख पीक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने सर्वाेतोपरी तंत्रज्ञान दिले असून, प्रत्येक जिलत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संशोधनाचे काम सुरू आहे.
बहुतांश संशोधन केंद्र पूर्व विदर्भात आहेत. त्यामुळे याच विद्यापीठाला भरपूर निधी, पुरेपूर मनुष्यबळ देऊन अधिक बळकट केल्यास विभाजनाचा प्रश्नच उद्भवणार नाही. पूर्व विदर्भात स्वतंत्र विद्यापीठ झाले तर रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील, चैतन्य निर्माण होईल. त्यामुळे विभाजन झालेच पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली होती.
दरम्यान, डॉ.वाय.एस.पी. थोरात समितीला शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असून, या तीन महिन्यात या समितीला शासनाला अहवाल सादर करायचा आहे.




No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..