Maharashtra 10,000 Vacancy in Police Recruitment in 2014
राज्यात १0 हजार पोलिसांची भरती आणि १२१ नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी
करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती
सूत्रांनी दिली.
आयपीएस अधिकार्यांच्या बदलीचे भिजत घोंगडे कायम
असताना पोलीस भरतीचा दिलासा गृहखात्याला मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या
आजच्या बैठकीत आदर्श सोसायटीचा चौकशी अहवाल, क्लस्टर डेव्हलपमेंट याबाबत
चर्चा झाली नाही. तथापि औद्योगिक विजेचे दर कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली,
मात्र अंतिम निर्णय झाला नाही, असे सूत्रांनी सांगितले. कोकणातील गौण
खनिजांच्या उत्खननावर असलेली बंदी अजूनही उठत नसल्याबद्दल उद्योगमंत्री
नारायण राणे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे समजते. मंत्रिमंडळाचा निर्णय : १२१ पोलीस ठाणे उभारणार
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net