MSRTC Recruitment 2014, Maharashtra ST Recruitment 2014 Apply Online Details
एसटी महामंडळाकडून राज्यात २ हजार २७५ कर्मचार्यांची नोकर भरती होणार आहे. यात अधिकारी, सुपरवायझर आणि मुंबईसाठी चालकांची पदे भरणार आहेत.
एसटीत येत्या काही महिन्यांत अधिकारी आणि चालकांची भरती होणार आहे. या भरतीचे काम नियमबाहय़ पद्धतीने एका कंपनीला देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. मात्र यात संबंधित अधिकार्यांची स्वतंत्र चौकशी न करता त्या अधिकार्यांकडूनच चौकशी अहवाल तयार करण्याचा अजब कारभार केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यावर ठोस कारवाई न होताच भरतीचे काम या कंपनीलाच देण्याची प्रक्रिया केली जात आहे.
एसटी महामंडळाकडून राज्यात २ हजार २७५ कर्मचार्यांची नोकर भरती केली जाणार आहे. यात अधिकारी, सुपरवायझर आणि मुंबईसाठी चालकांची पदे भरली जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी महामंडळाने काही दिवसांपूर्वी एक जाहिरात काढून ही भरती प्रक्रिया करणार्या कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेतला. यात आता सिग्मा नावाच्या कंपनीला हे काम देण्याची अंतिम प्रक्रिया केली जात आहे. कंपनीला तीन वर्षांचा अनुभव पाहिजे, अशी अट असतानाही नियमबाहय़ पद्धतीने या कंपनीला काम देण्याची प्रक्रिया केली जात आहे. ही बाब उघड झाल्यानंतर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष यांनी नोकर भरतीशी संबंधित अधिकार्यांनाच चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार याबाबतचा अहवाल तयार करून तो उपाध्यक्षांना सादर करण्यात आला आणि त्यांनी हा अहवाल एसटीचे अध्यक्ष यांना सादर केला.
याबाबत अध्यक्ष यांना विचारले असता, सिग्मा कंपनीचा प्रत्येक परीक्षार्थीमागचा दर हा १00 रुपये एवढा आहे, तर इतर आलेल्या एका कंपनीचा दर जवळपास २५0 रुपये होता. त्याचप्रमाणे सिग्मा कंपनीने चार अटी पूर्ण केल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांना हे काम देण्यात येणार आहे. एसटी महामंडळात भरती वेळेवर होणे गरजेचे असून, त्यामुळे अनेक कामांत येणारे अडथळे दूर होतील, असे ते म्हणाले. मात्र आपल्याकडे आलेला अहवाल हा ज्या अधिकार्यांकडे नोकर भरतीचे काम आहे, त्या संबंधित विभागाकडूनच आल्याचे विचारताच या संबंधी माहिती घेऊन स्वतंत्र चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
■ एसटी महामंडळाकडून राज्यात २ हजार २७५ कर्मचार्यांची नोकर भरती होणार आहे. यात अधिकारी, सुपरवायझर आणि मुंबईसाठी चालकांची पदे भरणार आहेत.
■ नियमबाहय़ पद्धतीने भरतीचे काम कंपनीला देण्याची प्रक्रिया केली जात आहे. हे उघड झाल्यानंतर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे यांनी संबंधित अधिकार्यांनाच चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net