Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, February 14, 2014

Gondwana Vidyapeet Vacant Posts of Lecturer 



गोंडवाना विद्यापिठांतर्गत असलेल्या ८९ महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे न भरल्याच्या कारणावरून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे गूण विद्यापिठाने कापले आहेत. परिणामत: वर्षभर अभ्यास करून आणि परीक्षा देऊनही विद्यापिठाच्या आडमुठय़ा धोरणामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य काळवंडले आहे. 
प्रहार विद्यार्थी संगठनेच्या पुढाकारात आज गुरूवारी झालेल्या एका पत्रकारपरिषदेत उपाध्यक्ष कार्तिक जोया यांनी ही व्यथा मांडली. ते म्हणाले, आम्ही वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केला. पालकांच्या आशा आमच्यावर आहेत. आम्ही परीक्षाही इमानदारीने दिली. पण गुणपत्रिका हाती पडली तेव्हा आमचे गूण कापलेले दिसले. 
महाविद्यालयातील पदे न भरल्याने विद्यापिठाने ही कारवाई केली आहे. हा कुलगुरूंकडून झालेला अन्याय आहे. या मनमानीविरोधात शुक्रवारी १४ फेब्रुवारीपासून जटपुरा गेटवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे साखळी आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला. विद्यापिठाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुर्लक्षपणाचे धोरण अवलंबित असून कुलगुरूंचेही याकडे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला. 
विद्यापिठातील कुणीही अधिकारी योग्य उत्तर देण्याऐवजी मनात येईल ते सांगून मोकळे होतात. परीक्षा नियंत्रक दडवे हे सुद्धा समाधानकारक उत्तर देत नसल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..