Maharashtra B.Ed, M.Ed Collages should Renew upto July 2014
नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या (एनसीईटी) निर्णयानुसार सर्व
शिक्षणशास्त्र महाविद्यालयांनी नॅशनल अँसेसमेन्ट अँक्रेडिएशन कौन्सिलतर्फे
मुल्यांकन व पुनर्मुल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. मुल्यांकन करून किमान
'बी' ग्रेड मिळविणार्या महाविद्यालयांनाच बी.एड.,एम.एड, बी.पीएड, एम.पीएड
अभ्यासक्रम चालविता येईल. परिणामी विद्यार्थी मिळत नसल्याने बंद पडत
असलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
बीएड.,एम.एड.
अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही
वर्षांपासून कमी होत असल्याने ही महाविद्यालये बंद पडली आहेत. त्यामुळेच
उच्च शिक्षण संचालनालयाने बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दोनच
फेर्या राबविण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
त्यात प्राध्यापक व प्राचार्यांचे पदे न भरणार्या महाविद्यालयांची
संलग्नता काढून घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी घेतला
होता. त्यानुसार सुमारे १३ महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. पुणे
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र
महाविद्यालयांची संख्या ११२ आहे. त्यात पुणे जिल्ह्यात ६१, अहमदनगरमध्ये २७
आणि नाशिकमधील २४ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांना नॅक
कडून मुल्यांकन करून घ्यावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net