Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, March 7, 2014

mahast.in - ST Mahamandal 2014 Exam Details, Admit Card, Paper Pattern, Syllabus, Result Details

mahast.in - ST Mahamandal 2014 Exam Details, Admit Card, Paper Pattern, Syllabus, Result Details


घोळात घोळ घालणाऱ्या एसटी महामंडळाने आता विविध पदांसाठी होऊ घातलेल्या परीक्षांमध्येही चांगलाच घोळ घालून ठेवला आहे. महामंडळातर्फे राज्यस्तरावर ९ आणि २३ मार्च रोजी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, एकाच दिवशी दोन स्वतंत्र पदांसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा घेण्यात येणार असून त्यामुळे या दोन्ही पदांसाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या शेकडो उमेदवारांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.



एसटीतर्फे अधिकारी, पर्यवेक्षक, ड्रायव्हर आदी पदांसाठी ९ आणि २३ मार्च रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. वेळापत्रकानुसार ९ मार्च रोजी पर्यवेक्षकपदासाठी सकाळी ११ वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहे, तर त्याच दिवशी दुपारी २ वाजता नवी मुंबईतील भारती विद्यापीठात अधिकारी पदाची परीक्षा ठेवण्यात आली आहे. एसटीतर्फे अधिकारी, अतांत्रिक वर्ग-२, तांत्रिक-२, पर्यवेक्षक अतांत्रिक, पर्यवेक्षक तांत्रिक, ड्रायव्हर, हेड मेकॅनिक, असिस्टंट या पदांसाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा होणार आहे. त्यासाठी पुण्यातील चाणक्य सॉफ्टवेअर सर्व्हिसेस लि.कडे परीक्षेसंदर्भातील जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या घोळामुळे दोन पदांसाठी परीक्षा देणे उमेदवारांना अशक्य झाले असून, त्यामुळे त्यांच्यात रोष आहे. एसटीने विविध पदांसाठी एकच अर्ज भरण्याची अट घातली होती. मात्र, त्याचे पालन करणाऱ्यांनाही एकाच जिल्ह्यात दूरदरची केंद्रे मिळाली आहेत.

फीमधून जमवले नऊ कोटी!

या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांवर अर्ज जमा झाले होते. त्यातील पात्र उमेदवारांची संख्या सुमारे दीड लाखांवर आहे. एसटीने प्रत्येकाकडून एका परीक्षेसाठी ४५० रुपये शुल्क आकारले असून, ही रक्कम सुमारे ९ कोटी रुपयांपर्यंत जाते. केवळ पात्र उमेदवारांकडून शुल्क घेण्याऐवजी एसटीने सरसकट शुल्क घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कमी केंद्रांचाही फटका

एसटीने परीक्षा केंद्रासाठी नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर आदी नऊ जिल्ह्यांची निवड केली. या कमी केंद्रामुळेही उमेदवारांना फटका बसणार आहे. त्यामुळे विविध पदांच्या इच्छुकांची प्रचंड धावपळ झाल्याचे सांगितले जाते.

एसटीचा विचित्र दावा

सगळ्या पदांसाठी एकच अर्ज भरण्याची व्यवस्था होती. काहींनी ते न पाळता वेगवेगळे अर्ज भरले, त्यामुळे त्यांना वेगळी केंद्रे मिळाली. आमच्या नियोजनात कोणतीही चूक नाही, असा विचित्र दावा एसटीचे महाव्यवस्थापक कॅ. आर.आर. पाटील आणि चाणक्य सॉफ्टवेअर सर्व्हिसेस यांनी केला आहे.


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..