Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, March 1, 2014

MIDC Fire Agnishaman Vimochak Physical Test Details Result, Selection Lists 2014

MIDC Fire Agnishaman Vimochak Physical Test Details Result, Selection Lists 2014

Agnishaman Vimochak Physical Test


Exam Venue:
MIDC Fire Station
Plot NO.8, Addl. Ambernath Industrial Area,
Opp. BSNL Godown, 
Ambernath (East) 421 506.
 
महत्वाच्या सूचना :-
१.     शारीरिक चाचणीसाठी येण्यापूर्वी आपण उपरोक्त पदासाठी आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता, वय वगैरे ज्या जाहिरातीत दिल्या होत्या, त्यानुसार पात्र आहात याची खात्री करून घ्या. जर आपण जाहिरातीत दिलेल्या अर्हतांपैकी एखादी अर्हता पूर्ण करत नसाल तर आपली उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
२.     शारीरिक चाचणीस येतांना कोणतेही उत्तेजक / मादक द्रव्य (Dope) सेवन करू नये. उत्तेजक द्रव्य / मादक द्रव्य (Dope) सेवन केलेले आढळल्यास आपली उमेदवारी रद्द केली जाईल.
३.     शरीरिक चाचणीच्या दिनांकात / वेळेत बदल करण्याची उमेदवाराची कोणतीही विनंती स्विकारार्ह असणार नाही.
४.     हे प्रवेशपत्र नोकरीसाठीचे नियुक्तीपत्र नाही याची नोंद घ्यावी.
५.     शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास मैदानी परीक्षेसाठी हाफ पँट व बनियन परिधान करणे आवश्यक राहील तथापि बुटांचा वापर ऐच्छीक राहील.
६.     शारीरिक क्षमता :-
अ.  उंची १६५ सें.मी.किमान 
ब. छाती ८१ सें.मी. (साधारण) व ८६ सें.मी. (फुगवून)  (किमान ५ सें.मी.फुगवणे आवश्यक )
क. वजन ५० कि.ग्रॅ. किमान
ड. दृष्टी – चष्म्याशिवाय (सामान्य)
   ७. मैदानी परीक्षा एकूण ५० गुणांची राहील :- गुणांचा सविस्तर तपशील व गुणांकन पद्धती महामंडळाच्या www.midcindia.orgया संकेत स्थळावर आहे. मैदानी परीक्षेमध्ये उमेदवारास खालील प्रकारच्या चाचणीस सामोरे जाने आवश्यक आहे.
अ) १०० मीटर अंतर सुमारे ५० कि.ग्रॅ. वजनाची मानवाकृती प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावून पूर्ण करणे. (१५ गुण)
ब) ड्रील टॉवरला लावलेल्या शिडीतून जलदगतीने चढणे व उतरणे. (१५ गुण)
क) १५ फुट उंचीच्या बांधलेल्या दोरावर चढणे व उतरणे. (१५ गुण)
व अतिरिक्त उंचीसाठी ५ गुण अशी एकूण ५० गुणांची मैदानी चाचणी होईल.
८.     उमेदवाराने मैदानी परीक्षा ही स्वताच्या जबाबदारीवर द्यावयाची असून या वेळेस प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे घडणाऱ्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील.
वरील शारीरिक मोजमापे व मैदानी परीक्षा गुणवत्ता पूर्वक खेळी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच मौखिक मुलाखतीसाठी पात्र ठरविले जाईल. उमेदवारांकडे खालील प्रमाणपत्र (मूळ) व प्रत्येकाची एक साक्षांकित प्रत चाचणीच्या वेळी असणे आवश्यक आहे.
·       जन्मतारखेचा दाखला ( यासाठी एस.एस.सी. किंवा तत्सम परीक्षेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.)
·       एस.एस.सी. व त्यापासून पुढील सर्व परीक्षांचे प्रमाणपत्र (पदवी / पदविका)
·       राखीव प्रवर्गातील उमेदवाराने सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
·       राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
·       सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरीत असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे सदर परीक्षेस हजर राहण्याबाबत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र (N.O.C)
·       कामाचा पुर्व अनुभव असल्यास सक्षम अधिकारयाचे नोकरीच्या कार्यकालाचे व कामाच्या स्वरूपाचे प्रमाणपत्र.
·       शारीरिक चाचणीसाठी प्रत्येक उमेदवाराने आपली ओळख पटवण्यासाठी स्वतःचे छायाचित्र असलेले कोणतेही एक ओळखपत्र (Photo Identity) सोबत आणणे आवश्यक आहे.(PAN Card, Election Card, Aadhar Card etc.)
9. निवड प्रक्रियेच्या संदर्भात कुणाही उमेदवाराने राजकीय किंवा अन्य दबाव आणणे हे अपात्रतादर्शक समजले जाईल.
 
 


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..