Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, March 25, 2014

Permenant EPF Number UAN

Permanent EPF Number UAN 


कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या पाच कोटींपेक्षा अधिक अंशधारकांना ऑक्टोबरपासून कायमस्वरूपी ईपीएफ क्रमांक उपलब्ध करून देणार आहे. हे कार्य कोअर बँकिंग प्रणालीवर आधारित आहे.
कायमस्वरूपी पीएफ खाते क्रमांक (यूएएन) मिळाल्यावर कर्मचार्‍यांनी नोकरी बदलली तरीही भविष्य निधी खात्याच्या स्थानांतरणासाठी दावा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
यूएएन मिळाल्यानंतर कर्मचारी दुसर्‍या कंपनीत रुजू झाल्यावरदेखील त्याचा पीएफ या खात्यावर जमा होत राहील. जे कर्मचारी सतत नोकरीत बदल करतात, त्यांच्यासाठी यूएएन क्रमांक फायद्याचा राहील, अशी अपेक्षा आहे. कर्मचार्‍याच्या संपूर्ण सेवाकाळासाठी यूएएन क्रमांक कायमस्वरूपी राहील. यामुळे कर्मचार्‍याने कितीही नोकर्‍या बदलल्या तरीही त्याचा पीएफ क्रमांक एकच राहील. ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के.के. जालान म्हणाले की, आम्ही अंशधारकांसाठी यूएएन क्रमांक लागू करण्याकरिता एक आराखडा तयार केला आहे. यूएएन क्रमांक १ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होईल.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..