MTS Exam 2014 Yeotmal District 14 Students
गुरुकुल बहुद्देशीय संस्था जळगावतर्फेघेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत यवतमाळ केंद्रातील १४ विद्यार्थीगुणवत्ता यादीत झळकले. वर्ग २, ३ व ६ साठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. भाषा, गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता आणि इतिहास या विषयावर आधारित ही परीक्षा होती.
वर्ग २ मधून यवतमाळ पब्लिक स्कूलचा तन्मय कैलाश नागपाल प्रथम, मिथिलेश मनोहर मडके दुसरा तर अमोघ आनंद कहाळेकर तिसरा आला. सुसंस्कार विद्यालयाचा प्रथमेश दीक्षित हा चतुर्थगुणवत्ताधारक विद्यार्थी ठरला.
वर्ग ३ मधून सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलचा चयन महेंद्र नहर, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल पांढरकवडाची शांभवी प्रशांत पोगाकवार हे प्रथम आले. यवतमाळ पब्लिक स्कूलचा अथर्व प्रशांत केळकर दुसरा तर आयूष धनंजय काळे (पांढरकवडा) हा तृतीय आला.
वर्ग ६ मधून स्कूल ऑफ स्कॉलर्सचा अक्षित अमीत मोर प्रथम, सुसंस्कार विद्यालयाचा पार्थहर्षवर्धन बोरा द्वितीय, यवतमाळ पब्लिक स्कूलचा पंचम देवेंद्र प्रभुणे तृतीय, अनुष्का गजानन जिर्गे चतुर्थ, सुधांशू संजय उरकुडे पाचवा आणि राम मानधना हा सहावा गुणवत्ताधारक विद्यार्थीठरला. प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि ४00 रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला जाणार असल्याचे यवतमाळ एमटीएस परीक्षा प्रमुख निहारिका प्रभुणे यांनी कळविले.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net