Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, April 18, 2014

SGBAU AmRavati University BA Final Year Summer 2014 News बीए अंतिम ऐवजी दिला द्वितीय वर्षाचा पेपर

SGBAU AmRavati University BA Final Year Summer 2014 News बीए अंतिम ऐवजी दिला द्वितीय वर्षाचा पेपर



बीए अंतिम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या पाकिटात चक्क बीए भाग-२ च्या प्रश्नपत्रिका निघाल्यामुळे परीक्षार्थ्यांचा गाेंधळ उडाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या या भाेंगळ कारभारामुळे १४0 परीक्षा केंद्रावरील बीए अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पेपर गुरुवारी पाऊण तास उशीरा सुरु झाला. 
अमरावती विद्यापिठाच्यावतीने परिक्षेत्रातील १४0 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९ ते १२ या कालावधीत बी.ए. अंतिम वर्षाचा गृहअर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. परीक्षा केंद्र संचालकांनी विद्यापिठाकडून पुरविण्यात आलेल्या बी.ए. अंतिम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका पाकिटावरील कोड क्रमांकाची खातरजमा करुन पाकीट उघडले आणि प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांना वितरित केल्या. लिफाफाबंद प्रश्नपत्रिकांवर बी.ए. अंतिम वर्ष असेच नमूद होते आणि लिफाफ्यावरही बी.ए. अंतिम वर्ष असेच अंकित होते. मात्र प्रश्नावली बी.ए. भाग-२ च्या अभ्यासक्रमातील होती.
हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न बी.ए. भाग-२ च्या अभ्यासक्रमातील असल्याचे लक्षात आले आणि गोंधळाला सुरुवात झाली. हा गोंधळ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राधिकारी आणि सहकेंद्राधिकारी यांच्या लक्षात आणून दिला. वर्ग खोलीत विद्यार्थिनींचा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे केंद्राधिकारी आणि सहकेंद्राधिकारी सातत्याने परीक्षा विभागातील अधिकार्‍यांशी आणि इतर परीक्षा केंद्रावरील केंद्राधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. तथापि प्रत्येक अधिकार्‍याचा फोन व्यस्त येत होता. हा गोंधळ जवळपास पाऊण तास सुरु होता. दुसरीकडे बीए भाग-२ च्या प्रश्नपत्रिकांवरही बी.ए. अंतिम असेच लिहिेलेले होते. दरम्यान ज्या केंद्राधिकार्‍यांचा विद्यापिठाशी संपर्क झाला, अशा केंद्राधिकार्‍यांना बीए भाग-२ च्या ७ मे रोजी होणार्‍या गृहअर्थशास्त्र विषयाचे पाकीट उघडून त्यातील प्रश्नपत्रिका बीए अंतिमच्या परीक्षार्थ्यांना देण्याचे आणि विद्यार्थ्यांना पाऊण तास जास्त वेळ देण्याचे मौखिक निर्देश विद्यापिठाने दिले आणि परीक्षेला सुरुवात झाली. परंतु या गोंधळामुळे बीए भाग-२ चा पेपर फुटला आहे. प्रश्नपत्रिका काढण्यात मॉडरेटरची भूमिका महत्त्वाची असते. प्रश्नपत्रिकेची अंतिम छपाई होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचे प्रुफ तपासण्याकरिता संबंधितांकडे पाठविण्यात येतात. आजच्या घटनेत छपाई करणार्‍याची चूक असली तरी प्रुफ तपासणीत हा दोष लक्षात का आला नाही.अर्थशास्त्राच्या पेपरमधील घोळ हा मॉडरेशनदरम्यान झाला. पेपर संच तयार करताना आतील माहिती गोपनीय ठेवण्याच्या उद्देशाने मॉडरेटरनी केलेल्या कामावर इतरांना लक्ष देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अचानक आढळून आलेली चूक दुरुस्तीसाठी सर्व महाविद्यालयांना कळविण्यात आले. नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास पेपर सोडविण्यासाठी वाढविण्यात आला.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..