Krishi Vidyapeeth Recruitment 2014 Canceled
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची वरिष्ठ पदांची नोकर भरती प्रक्रिया
अखेर रद्द करण्यात आली आहे. नियमबाह्य पद्धतीने ही प्रक्रिया सुरू
केल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या असोसिएशन ऑफ अँके डमिक
स्टाफ (आष्टा) या संघटनेने व इतर कृषी शास्त्रज्ञांनी मुंबई उच्च
न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. न्यायालयाने याबाबत
स्पष्टीकरण मागितल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर)
परिषदेनेचे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे निवेदन
न्यायालयासमोर सादर केले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये अधिष्ठाता व
संचालकांची १0 पदे भरण्यासाठी गतवर्षी जुलै महिन्यात जाहिरात काढली होती.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net