Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, May 7, 2014

Nagpur Zilla Cast Certificate Validity Verification Pending Cases 2014

Nagpur Zilla Cast Certificate Validity Verification Pending Cases 2014

जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ क ार्यरत आहे. या समितीकडे एप्रिल २0१३ ते एप्रिल २0१४ दरम्यान प्राप्त झालेल्या ४९,९६७ प्रकरणांपैकी ४५,५७६ प्रकरणांवर वैध निर्णय घेऊ न निपटारा केल्याची माहिती संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुरेंद्र पवार यांनी सोमवारी दिली.
७३ प्रकरणांवर अवैध निर्णय घेण्यात आला आहे. १५0८ प्रकरणे इतर कारणांमुळे निकाली काढण्यात आलेली आहेत. एप्रिल २0१४ अखेर प्रलंबित असलेल्या २८१0 प्रकरणांपैकी १२२५ प्रकरणे विद्यार्थ्यांची, १४४७ कर्मचार्‍यांची, १0५ निवडणूकविषयक तर ३३ प्रकरणे इतर कारणांमुळे प्रलंबित आहेत. प्रकरणे प्रलंबित असलेल्या २८१0 अर्जधारकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत.
दूरध्वनी क्रमांकावरही सूचना दिलेल्या आहेत. परंतु प्रतिसाद मिळालेला नाही. उर्वरित प्रकरणांपैकी १४४७ प्रकरणे राज्याबाहेर वास्तव्य असलेले व कागदपत्रे अपूर्ण असलेल्यांची आहेत. त्यांनी तत्काळ समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.
प्रस्ताव आक्षेपात असल्यास कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एमएमसीव्हीसीएनजीपी या नावाने एसएमएस पाठविला जातो. तसेच प्रकरण वैध ठरल्यानंतर प्रमाणपत्र घेऊ न जाण्याबाबत एसएमएसद्वारे कळविले जाते. ज्या विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित असतील अशा अर्जधारकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच सेवाविषयक अर्जधारकांनीही कार्यालयाशी संपर्क साधून त्रुटीची पूर्तता करावी. वारंवार सूचना दिल्यानंतरही ३६५४ अर्जधारकांनी जात वैधता प्रमाणपत्र नेलेले नाही. ज्या अर्जधारकांनी प्रमाणपत्र नेलेले नाही, त्यांनी कार्यालयाच्या वेबसाईटवर बघावे, माहिती उपलब्ध न झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.





No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..