Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, June 28, 2014

11th Admission 2014 Mumbai Details, CAP Round, Merit List, Waiting List, Selection List

11th Admission 2014 Mumbai Details, CAP Round, Merit List, Waiting List, Selection List



अल्पसंख्याक, इनहाऊस कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागा कनिष्ठ महाविद्यालयांनी शुक्रवारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सादर केल्या. इनहाऊस, मॅनेजमेंट आणि अल्पसंख्याक सीट अशा रिक्त राहिलेल्या एकूण ३१ हजार ४३१ जागा ऑनलाईन प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर होणार आहे. अकरावीसाठी १ लाख ९८ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची वाढविलेली मुदत शुक्रवारी दुपारी चार वाजता संपली. प्रवेश अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १ लाख ९८ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपली तरी ३ हजार ७0६ विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. तर ७७३ विद्यार्थ्यांनी अर्ज संपूर्ण भरला असला तरी तो ऑनलाइन प्रवेशासाठी सादर केलेला नाही. दहावी परीक्षेच्या निकालानंतर अल्पसंख्याक/ इनहाऊस कोट्यातील प्रवेशाची मुदत १८ ते २७ जूनपर्यंत दिली होती. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा महाविद्यालयांनी ऑनलाइनसाठी सादर केल्या आहेत. अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी एकूण २ लाख ८३ हजार ७२२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी १ लाख २३ हजार ५९४ जागा इनहाऊस, अल्पसंख्याक आणि मॅनेजमेंट सीटसाठी दिल्या होत्या. त्यामुळे १ लाख ६0 हजार १२८ जागांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार होते. परंतु विविध कोट्यातील ३१ हजार ४३१ रिक्त जागा महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेशासाठी सादर केल्या आहेत. ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.  

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..