Mahavitaral Bogus Recruitment Process 2006 | MSEB Bogus Bharti
शासकीय कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे नियुक्त्या करण्याचा प्रकार नवा नाही. राज्य सरकारच्या वीजनिर्मिती कंपनीनेही कार्यकारी अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत नियमांना डावलून या पदांवर अभियंत्यांची नियुक्ती केली. त्याबरोबरच अपात्र नसलेल्या उमेदवारांना पदावर नसतानाही वरच्या पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाला असल्याचे कळले.महानिर्मितीने २००६ साली कार्यकारी अभियंत्यांची पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. या पदासाठी १५ वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली होती. दरम्यान, या प्रक्रियेसाठी इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन कांदिवली, मुंबई या संस्थेला कामाचे कंत्राट देण्यात आले होते. महानिर्मितीच्या नियमानुसार सक्षम समितीचे गठन करून या अभियंत्यांची निवड करणे गरजेचे असते. मात्र, निवडण्यात आलेल्या ३६ उमेदवारांचीच या पदासाठी निवड करण्यात आली.
निवड प्रक्रियेदरम्यान बरेच उमेदवार कार्यकारी अभियंता पदासाठी सक्षम नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या निवड प्रक्रियेस विरोध होता.
वेतनश्रेणीचे नियमही धाब्यावर
नियमबाह्यपणे कार्यकारी अभियंता पदावर भरती करण्यावर हा प्रकार थांबला नाही, तर अनेकांना नियमबाह्यपणे वेतन श्रेणीही लागू करण्यात आल्याची माहिती झोडे यांनी पुढे आणली आहे. यामध्ये ३६ अभियंत्यांची ज्यावेळी कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी ३४ उपकार्यकारी अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदाची वेतनश्रेणी देण्यात येत होती. तर ७२ उपकार्यकारी अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदाची वेतनश्रेणी आणि ७२ उपकार्यकारी अभियंत्यांना कार्यकारी अभियंत्यांच्यावरील अधीक्षक अभियंता पदाची श्रेणी देण्यात आली आहे.
अशा झाल्या नियुक्त्या
कार्यकारी अभियंता पदावर करण्यात आलेल्या ३६ नियुक्त्यांमध्ये ८ कनिष्ठ अभियंते आणि १६ सहाय्यक अभियंत्यांची थेट कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये ३६ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांना आवश्यक असलेला वीजनिर्मिती क्षेत्राचा, तर ४ उमेदवारांना पदवीनंतरचा १५ वर्षाचा अनुभव नसताना त्यांच्या बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या करताना महानिर्मितीमध्ये ३० ते ३२ वर्षांचा अनुभव असलेले उपकार्यकारी अभियंते उपलब्ध असताना त्यांना डावलण्यात आल्याची माहिती आहे.
भरतीप्रक्रियेत कोणाचाच हस्तक्षेप नाही. महानिर्मितीमध्ये भरती प्रक्रिया आउटसोर्सिंग पद्धतीने करण्यात येते. पदभरतीसाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येते. तसेच मेरिटनुसारच भरती आणि पदोन्नती देण्यात येते. त्यामुळे भरती प्रक्रियेत कुठलाही घोटाळा होण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना या भरतीप्रक्रियेबद्दल आक्षेप किवा तक्रार आहे त्यांनी चर्चेसाठी यावे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net