MT-CET 2014 Admission, Date Updates, Changed, Re Open Details Pharmacy Admission
बी-फार्मसीसाठी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना यंदा एम-टी-सीईटी-२0१४ ही परीक्षा देणे अनिवार्य होते. गेल्या वर्षापर्यंत एम-एच-सीईटी परीक्षा दिल्यानंतर अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) किंवा फार्मसी विभागामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असे. मात्र यंदा अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या प्रवेशासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला. मात्र विद्यार्थ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन न झाल्याने अनेक विद्यार्थांनी बी- फार्मसी प्रवेशासाठीची एम-टी-सीईटी-२0१४ची परीक्षाच दिली नाही. परिणामी त्यांना प्रवेशासाठी अडचण येते आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. विद्यार्थी आणि पालक चौकशीसाठी महाविद्यालयात येतात. मुलाचे यंदाचे वर्ष फुकट जाते की काय, अशी भीती पालकांना वाटत आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
यंदा बी-फार्मसीसाठी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एम-टी-सीईटी-२0१४ ही परीक्षा देणे अनिवार्य होते. गेल्या वर्षापर्यंत एम-एच-सीईटी परीक्षा दिल्यानंतर अभियांत्रिकी इंजिनीअरिंग) किंवा फार्मसी विभागात गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असे. मात्न आता अभियांत्रिकीकरिता जेईई-२0१४ व बी-फार्मसीकरिता एम-टी-सीईटी २0१४ अशा वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन तंत्न शिक्षण संचालनालयाने घेतला तर वैद्यकीय शिक्षणासाठी एम-एच-सीईटी-२0१४ची परीक्षा देणे अनिवार्य केले आहे. मात्न विद्यार्थ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन न झाल्याने अनेक विद्यार्थांनी फार्मसी प्रवेशासाठीची एम-टी-सीईटी-२0१४ची परीक्षा न देता एम-एच-सीईटी-२0१४ परीक्षा दिली. त्यामुळे त्यांना बी-फार्मसी प्रवेशासाठी अडचण निर्माण झाली आहे. हे सारे विद्यार्थी फार्मसी प्रवेशाला मुकले आहेत.
वास्तविक अभियांत्रिकी, बी-फार्मसी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी बदल झालेल्या कोणकोणत्या पूर्वपात्नता परीक्षा द्यायच्या आहेत, त्याचे योग्य मार्गदर्शन त्या-त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना करणे गरजेचे होते. महाराष्ट्र शासनाने आणि शिक्षण विभागाने बदललेले धोरण वेळोवेळी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविणे गरजेचे होते. मात्न तसे न केल्याने विद्यार्थ्यांंच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालक विविध फार्मसी महाविद्यालयांमध्ये जाऊन विनवण्या करीत आहेत. त्यासाठी पैसा व वेळ वाया जात आहे. तरीही पदरी निराशा येत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा संतप्त प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला देश पातळीवरील नीट (एनईईटी) पूर्वपात्नता परीक्षा देणे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी अकरावीपासून त्यादृष्टीने तयारी सुरू केली होती. मात्र या वेळी वैद्यकीय शिक्षणासाठी एम-एच-सीईटी-२0१४ ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली . तसेच गेल्या वर्षी अभियांत्रिकी विभागात प्रवेश मिळण्यासाठी बारावी परीक्षेत ४५ टक्के गुणांच्या मुलांना प्रवेश मिळत होता, तर आरक्षणार्थींंना ४0 टक्के गुणांना प्रवेश मिळत होता. यंदा त्यात बदल करून अनुक्रमे ५0 व ४५ टक्क्यांची अट केल्याने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांंची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ५0 हजारांच्या वर अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ..तरच प्रवेश सुरळीत र८ेु'>च्/र८ेु'>शासनाने नुकतेच मराठा व मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीसाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्याचा लाभ लवकर मिळाल्यास काही जागा उपलब्ध होऊ शकतील, मात्न या धोरणाची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. र८ेु'>
च्/र८ेु'>तसे झाले तरी त्या विद्यार्थ्यांना आर्थिक फायदा कितपत होईल, हे आताच सांगता येत नाही. कारण या जागा मॅनेजमेंटच्या असतील. यापुढे महाराष्ट्र शासनाने व शिक्षण विभागाने होणारे बदल वेळीच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविणे गरजेचे आहे. तरच सर्व प्रवेश सुरळीत होतील. र८ेु'>च्/र८ेु'>एखाद्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्याला बारावीला पन्नास टक्के गुण आहेत आणि पीसीएम ग्रुपला एकशे पन्नास गुण आहेत व त्याने पूर्व पात्नता परीक्षा दिली असेल तो प्रवेशास पात्न ठरेल, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला बारावीत साठ टक्के गुण आहेत व त्याला पीसीएम ग्रुपला एकशे अठ्ठेचाळीस गुण असून पूर्वपात्नता परीक्षेत भरपूर गुण असले तरी त्याला अभियांत्रिकी विभागात प्रवेश मिळणार नाही, हा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय म्हणावा लागेल. यापेक्षा पीसीएम ग्रुपला एकशेपन्नास गुण किंवा बारावीला पंचावन्न टक्के गुण आणि आवश्यक पूर्वपात्नता परीक्षा अशी अट ठेवल्यास हा अन्याय दूर होईल. अशीच परिस्थिती बी-फार्मसी प्रवेशासाठीही आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net