Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, June 16, 2014

SETU Mobile Apps Download For Various Documents

SETU Mobile Apps Download For Various Documents | Maharashtra SETU App Mobile Android, IPhone, Windows 8, BlackBerry

SETU Nashik Download, SETU Nashik Details

विविध प्रकारच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी सेतू कार्यालयात वारंवार होणाऱ्या चकरांना आता पूर्णविराम मिळणार आहे. नाशिक सेतूचे मोबाईल अॅप सोमवारपासून (१६ जून) सेवेत येणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

विविध प्रकारच्या शैक्षणिक प्रवेशांसाठी सरकारतर्फे दिले जाणारे शैक्षणिक दाखले अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. दाखल्यांसाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी विद्यार्थ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. त्यात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र यासारख्या दाखल्यांसाठी अर्जदारांना सेतू कार्यालयात यावे लागते. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना विद्यार्थ्यांची सेतू केंद्रांवर मोठी झुंबड उडते. अचानक वाढलेल्या अर्जांमुळे वेळेत प्रमाणपत्रांचे

वितरण अवघड होते.

विद्यार्थ्यांना संबंधित दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्याने अनेकदा माहिती घेण्यासाठीही सेतू केंद्रांमध्ये गर्दी होते. शिवाय, अर्ज सादर केल्यानंतर ठराविक कालावधीत दाखला तयार झाला आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठीही सेतू केंद्रात चकरा सुरू असतात. परिणामी, विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. या प्रक्रियेतून दिलासा मिळण्यासाठी काही वर्षांपूर्वीच नाशिक सेतूची वेबसाईट कार्यरत करण्यात आली. आजकाल स्मार्ट फोन वापराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. खासकरुन विद्यार्थ्यांचे स्मार्ट फोन वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही बाब ओळढूनच अँड्रॉईड फोनसाठीचे 'सेतू नाशिक' हे मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. दहावीचा निकाल मंगळवारी घोषित होणार असल्याने सोमवारीच हे अॅप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन उपजिल्हाधिकारी निलेश जाधव यांनी दिली.

असे असेल अॅप

'सेतू नाशिक' हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे लागेल. कुठल्या प्रकारचे दाखले सेतू केंद्रातून दिले जातात. प्रत्येक दाखल्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात, शहरात कुठल्या ठिकाणी सेतू कार्यालय आहेत, अशी माहिती या अॅपद्वारे सहज मिळू शकणार आहे. तसेच, ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती या अॅपवर जाणून घेता येईल. त्यासाठी अर्ज सादर करते वेळी देण्यात आलेल्या स्लीपवरील क्रमांक आवश्यक असणार आहे.

अर्जाची सुविधा लवकरच

विविध दाखल्यांसाठी अर्ज करण्याची सुविधाही लवकरच या अॅपवर उपलब्द करुन दिली जाणार असल्याची माहिती सेतू केंद्राचे संचालक कैलास आढाव यांनी दिली. तसेच, या अॅपची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याचेही आढाव यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..