TYBCOM 2014 Result Mumbai University First Half | टीवायबीकॉमचा निकाल जाहीर
TYBCom Sem 6 Result 2014 Mumbai University Result Links given Below :
TYBCom 5th Semester 2014 Result Links given Below :
मुंबई विद्यापीठामार्फत श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या
टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री साडे नऊ
वाजण्याच्या सुमारास जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल ७३.७१ टक्के लागला
आहे.
विद्यापीठामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेला ६३
हजार ७५७ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४६ हजार ८३९ विद्यार्थी उत्तीर्ण
झाले आहेत. तर १६ हजार ७१0 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. गुरुवारी
रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टीवायबीकॉमचा सेमिस्टर सहाचा निकाल
ऑनलाइन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर
निकाल पाहता येईल. टीवायबीकॉम परीक्षेसाठी ६४ हजार २ विद्यार्थ्यांची
नोंदणी झाली होती. यापैकी ११ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झाला. ६३ हजार
९९१ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. तर २३४ विद्यार्थी परीक्षेला
अनुपस्थित राहिले. मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या पारंपरिक पद्धतीत बदल
करत तीन वर्षांपूर्वी श्रेयांक श्रेणी पद्धत लागू केली होती. या
पद्धतीनुसार टीवायची परीक्षा घेण्यात आली. या श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार
जाहीर होणारा टीवायबीकॉमचा हा पहिलाच निकाल ठरला आहे..
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net