Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, June 16, 2014

UPSC 2014 New Exam Pattern

UPSC 2014 New Exam Pattern | UPSC Exam Paper Pattern 


युपीएससीच्या नवीन पॅटर्ननुसार आता युपीएससी मुख्य परीक्षा ही २000 गुणांऐवजी १८00 गुणांची करण्यात आली आहे. तसेच मुलाखतीला ३00 गुणांऐवजी २५0 गुण देण्यात आले आहे. मुख्य परीक्षेसाठी दोन ऐवजी एकच वैकल्पिक विषय निवडायचा आहे. आयोगाने दिलेल्या यादीपैकी प्रादेशिक भाषा वाड्मयचा अपवाद वगळता कोणत्याही शाखेतील पदवीधर कोणतेही विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडू शकतो. प्रादेशिक भाषा वाड्मयची पदवी संपादित केलेल्या विद्यार्थ्यांलाच संबंधित प्रादेशिक भाषा वाड्मय वैकल्पिक विषय म्हणून निवडता येईल.
मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयाखेरीज
पेपर -१ निबंध (२00 गुण ) आणि 
इंग्रजी आकलन (१00 गुण) ,
पेपर - २ भारतीय वारसा, 
संस्कृती इतिहास आणि
भारत व जगाचा भूगोल (२५0 गुण),
पेपर -३ कारभार प्रक्रिया, 
राज्य घटना, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध (२५0 गुण),
पेपर - ४ अर्थव्यवस्था, 
पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (२५0 गुण) आणि
पेपर - ५ नैतिकता, निष्ठा, व कला दृष्टिकोन (२५0) अशा पाच विषयांचा समावेश असतो. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व, मुख्य आणि व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) अशा तीन टप्प्यांत घेण्यात येणार्‍या या परीक्षेतील मुख्य व मुलाखत या टप्प्यात मूलगामी स्वरूपाचे बदल केले आहेत. या परीक्षेसाठी निवडावयाचे वैकल्पिक विषय, त्यांचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे वैकल्पिक विषय निवडीचे स्वातंत्र्य, सामान्य अध्ययन या विषयाचे एकूण पेपर, त्यांचा अभ्यासक्रम या विविध विषयांसाठी निर्धारित गुण आणि परीक्षेचे माध्यम या संदर्भात नव्या बाबींचा स्वीकार केला आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..