Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, August 29, 2014

Jan Dhan Yojna Bank of India, Bank of Maharashtra Details

Jan Dhan Yojna Bank of India, Bank of Maharashtra Details

Jan dhan Yojna Details in Marathi given below Details on occasion with Bank of India & Bank of Maharashtra Nagpur. 
पंतप्रधान जन-धन योजना देशातील गरिबी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व यातून समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील साई सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक संचालक ज्योतिका जीवनी, बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अरुण श्रीवास्तव, बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक नंदकुमार पुजारी आणि आयडीबीआय बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी.के. बत्रा यांच्यासह महापौर व आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, नागो गाणार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, समाजातील गोरगरीब जनतेसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. गावात, झोपडपट्टय़ात राहणार्‍या नागरिकांचे बँकेत खाते उघडून देण्यात येणार आहेत. सहा महिने सुरळीत व्यवहार केल्यावर खातेधारकाला पाच हजार रुपयांपर्यंत 'ओव्हरड्राफ्ट' मिळण्याची सुविधा यात आहे. तसेच एक लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. यातून गोरगरिबांना आर्थिक मदत तर होईलच शिवाय केंद्र व राज्याच्या विविध योजनांचाही त्याला लाभ मिळेल. त्याला सावकाराकडे जाण्याची गरज भासणार नाही. गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल असून, यातून समाजाचे आर्थिक व सामाजित चित्र बदलेल. समाजातील आर्थिक विषमता दूर होईल.
बँका सद्यस्थितीत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच कर्ज देते, गरीब जनता वंचित राहते. या योजनेतून त्यांना अर्थपुरवठा होणार आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची वृत्ती गरिबांची असते. त्यामुळे परतफेडीनंतर अधिक कर्जही त्यांना मिळू शकेल. योजनेची अंमलबजावणी करताना बँकेच्या अधिकार्‍यांनीही मानवी दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. महिला बचत गटांनाही या योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नागपूर विभागातील विविध खातेदारांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बँकेच्या पासबुकचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अरुण श्रीवास्तव यांनी केले तर उपस्थितांचे आभार बँक ऑफ इंडियाचे महेंद्र वाही यांनी मानले.
देशपातळीवर या योजनेचा शुभारंभ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.

Important Links of Jan dhan Yojna are given below

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..