Maharashtra ITI Admission 2014 Last Round Seat Details, Vacant seats
Maharashtra ITI Admission 2014 Details, Last round available seat details, Large Number of Seats Vacant In Maharashtra, dvetadmission.in details about ITI 2014 Admission rounds
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. परंतु शेवटची फेरी शिल्लक असताना राज्यात तब्बल ५0 हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेंगाळलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. अमरावती विभागात १0 हजार २५६ जागांपैकी २ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.
दहावीनंतर नोकरीचा हमखास मार्ग म्हणून विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आयटीआयला राहिली आहे. त्यामुळेच या शासकीय औद्योगिक संस्थेत प्रवेशासाठी दरवर्षी गर्दी होते. मागील वर्षीपासून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. परंतु ऑनलाईन प्रक्रियेतील अनेक त्रुटींमुळे ही पद्धती गैरसोयीचीच ठरली आहे. तब्बल दीड महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी वाट बघून इतरत्र प्रवेश घेतला आहे. परिणामी राज्यातील प्रवेश क्षमतेच्या सरासरी ४0टक्के जागा चौथ्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गुंतागुंतीची मानली जात आहे. तंत्र शिक्षण प्रवेश प्रक्रियेत केवळ तीन फेर्या असताना आयटीआय प्रवेशाकरिता मात्र सहा फेर्या ठेवल्या आहेत. अकरावीचे प्रवेश रद्द करण्यासाठी शिक्षण संस्थांनी तब्बल दहापट शुल्क आकारणी लागू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आयटीआयपासून दुरावत गेले. आयटीआयमध्ये विविध ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना कंपन्यांमध्ये त्वरित रोजगार मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षीपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net