Maharashtra Rajiv Gandhi Nivara Yojna 2014 For Housing Scheme
Rajiv Gandhi Nivara Yojna 2014 Details new updates are given below. Also important links to read more details, application Form & other Important Links are given below.राजीव गांधी निवारा योजनेंतर्गत (सुधारित) १ एप्रिल २0१३ पासून घरकूलाची किंमत ७0 हजार रूपयांवरून १ लाख रूपये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे घरकुलाकरिता सध्याच्या राज्य शासनाच्या ६८ हजार ५00 या अनुदानामध्ये २६ हजार ५00 इतकी वाढ करून सदर अनुदान ९५ हजार रूपये करण्यात आले आहे.
या संदर्भात राज्याच्या गृह निर्माण विभागाने २२ ऑगस्ट २0१४ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थ्यांकरिता राबविण्यात येणार्या राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक १ (सुधारित) या योजनेला ३१ मार्च २0१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच या योजनेच्या घरकुलाच्या अनुदानात वाढकरून या योजनेसाठी क वर्ग नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या योजनेचे राजीव गांधी घरकूल योजना असे नवे नामकरण करण्यात आल्याचे शासन निर्णयात तरतूद आहे. गृह निर्माण विभागामार्फत राबविण्यात येणार्या राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत राज्यभरात २१ हजार घरकूले बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. या योजनेंतर्गत सर्वप्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी जून २0१४ च्या पावसाळी अधिवेशनात १00 कोटींचा निधी पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आला आहे. या योजनेत ५ हजार रूपये लाभार्थी हिस्सा ठेवण्यात आला असून सदर घरकूल योजना ही १ लाख रूपये किंमतीची करण्यात आली आहे.
राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत सन २0१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ८२९ लाभार्थ्यांसाठी ७ कोटी ८७ लाख ५५ हजार रूपयाचे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. या योजनेच्या घरकुलाच्या अनुदानात वाढकेल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net