Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, August 3, 2014

Nagpur Mahanagar Palika (NMC) Teachers Recruitment 2014

Nagpur Mahanagar Palika (NMC) Teachers Recruitment 2014



महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रि येमुळे मनपा सेवेतील अंशकालीन तासिका तत्त्वावरील कार्यरत शिक्षकांवर अन्याय होत असल्याने या भरती प्रक्रि येला महापौर अनिल सोले यांनी स्थगिती दिली आहे. 
२३ जूून २0१४ च्या जाहिरातीनुसार मनपातर्फे शिक्षक भरती प्रक्रि या राबविली जात होती. परंतु यामुळे कार्यरत ३८ अंशकालीन शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे शिक्षक संघाच्या पदािधकार्‍यांनी सोले यांच्या निदर्शनास आणले. हा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन सोले यांनी सुधीर लांडगे यांच्या नेतृत्वातील शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. 
घड्याळी तासिका शिक्षकांना तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यामुळे मनपाला शिक्षक मिळत नव्हते. अशा विपरीत परिस्थितीत ३८ शिक्षक मागील ६ वर्षापासून कार्यरत आहे. मनपाच्या भरती प्रक्रि येमुळे या शिक्षकांवर अन्याय होणार होता. त्यामुळे भरतीचे नियम शिथिल करून या शिक्षकांना प्राधान्याने नोकरीत समावून घेण्यात यावे, उर्वरित जागा खुल्या स्पर्धेतून भराव्यात, अशी मागणी संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..