HSC 2015 Exam Online Application Form
Maharashtra HSC 2015 Examination online application form submission last date is extended uptp 21 October 2014. Check the details & application form links from the links given below. check all details & important dates from following section.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात येणार्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. मुदतवाढीनुसार नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात येणार्या बारावी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्याची सोमवारी शेवटची मुदत होती. परंतु कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना निवडणूक काम देण्यात आल्याने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आठ दिवसांनी वाढविण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे केली होती. शिक्षक संघटनांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने मंडळाने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यानुसार २१ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह आणि ३१ ऑक्टोबर रोजी विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणार असून, विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी आल्यास प्राचार्य, मुख्याध्यापकांनी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
2 comments:
Every child has to get proper education during his/her childhood. Study Masters in USA will mold the child's character whereas graduation will teach the technical knowledge and skills that are needed to accomplish complex and real world problems.
Also find the Sarkari Naukri at your preferred location based on your convienience. The Govt Jobs posted are based on Education and Skills.
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net