Nagpur University Winter 2014 Examination Starting from 30 October 2014
Nagpur University Winter 2014 Examinations are starting from 30 October 2014. All details & timetable links of BA, BCom, BSc, BCA, BEd, BBA, MBA, MCA & all UG, PG Courses are given below. Check all details.
३ टप्प्यांत होणार परीक्षा
■ विद्यापीठाने सुरुवातीला केलेल्या घोषणेनुसार ७२४ विषयांची परीक्षा ५ ऐवजी ३ टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार्या दुसर्या टप्प्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा होती तर तिसर्या व अखेरच्या टप्प्यात सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील. मूल्यांकनाचे आव्हान पाहता विद्यापीठाने २५ डिसेंबरपर्यंत परीक्षा संपविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी यंदाच्या हिवाळी परीक्षा म्हणजे एक मोठे आव्हानच आहे. विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक मागेच जाहीर केले असून परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात यासाठी परीक्षा विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. ३0 ऑक्टोबरपासून परीक्षांना सुरुवात होणार असून साधारणत: २५ डिसेंबरपर्यंत त्या चालणार आहेत. हिवाळी परीक्षा शैक्षणिक कॅलेंडरमध्ये नमूद केलेल्या तारखांपेक्षा २0 दिवस विलंबाने सुरू होणार आहेत.
विद्यापीठाने सुरुवातीला १0 ऑक्टोबरपासूनच परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली होती. परंतु विधानसभा निवडणुकांना पाहता तारखा निश्चित करण्यात अधिकार्यांची चांगलीच कसरत झाली. जर १0 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्या असत्या तर १५ ऑक्टोबरच्या मतदानामुळे वेळापत्रकात 'गॅप' द्यावी लागली असती.
अखेरच्या क्षणी १५ ते २0 तारखेदरम्यानचे पेपरदेखील रद्द करावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील अडचण झाली असती व विद्यापीठाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असता. त्यामुळेच या परीक्षा ३0 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
साधारणत: परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवरील हलगर्जीमुळे विद्यापीठाला फटका बसल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढीस लागल्या आहेत. चुकीच्या पेपरचे पाकीट उघडणे, परीक्षा केंद्रांवरील गैरसुविधा इत्यादींमुळे विद्यार्थ्यांनादेखील मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा असे प्रकार घडू नयेत याकरीता परीक्षा विभागाने सर्व परीक्षा केंद्रांना कडक सूचना केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net