Nagpur RTO Online Appointment License - sarathi.nic.in
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी ऑनलाईन
अपॉईंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवार आपल्या
सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतो. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या या
योजनेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन १ डिसेंबरपासून आरटीओ ग्रामिण,
शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (पुर्व) पक्क्या वाहन परवान्यासाठी
ऑनलाईनची सक्ती करण्यात आली आहे. शिकाऊ परवानासाठी प्रत्यक्ष हजर राहून
मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ
उमेदवारांची प्रचंड गर्दी होत होती. नागरिकांना तासनतास उभे राहावे
लागायचे. त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात होता. काही वेळा पूर्ण दिवस वाया
जात होता. या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन कार्यालयाने ऑनलाईन
अपॉईंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली. आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १
सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७
सप्टेंबरपासून ही पद्धत सुरू झाली. सुरुवातीला याला कमी प्रतिसाद मिळाला,
परंतु आठवड्याभरातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. आता याला घेऊनच
सोमवारपासून पक्क्या परवान्यासाठीही हीच पद्धत लागू होणार आहे. या सोयीमुळे
उमेदवाराला वाहन चाचणीसाठी आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवड करणे शक्य
होणार आहे. उमेदवाराने www.sarathi.nic.in या संकेत स्थळावर जाऊन 'इश्यू ऑफ
परमनन्ट लायसन्स टू मी' यावर क्लिक करावे.
|
|
|