Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, November 22, 2014

Cast Validity Process be Faster & Instant Soon

Cast Validity Process be Faster & Instant Soon 


जाती पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेत गती आणण्यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत ३६ जिल्हा समितींची निर्मिती करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंत्रालयातील एका बैठकीत घेतला.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी महिनोगिनती प्रतीक्षा करावी लागणार्‍या एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी व नोकरदारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकेल.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी हे या नव्या जिल्हा समितीचे प्रमुख असतील. जाती वैधता प्रमाणपत्रांसाठी कराव्या लागणार्‍या प्रतीक्षा कालावधीत कपात करणे हा मुख्य उद्देश या समितींच्या निर्मितीमागे आहे.
मुख्यत्वे शैक्षणिक, नोकरीविषयक, निवडणूक या ठिकाणी आरक्षणाच्या प्रवर्गात हक्क सांगण्यासाठी जाती प्रमाणपत्रांची गरज भासते. ऐन महत्त्वाच्यावेळी जाती प्रमाणपत्र न मिळाल्याने संधी हुकल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..