Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, November 5, 2014

IAS Recruitment 70 Post Details

IAS Recruitment 70 Post Details Maharashtra


राज्यात ७0 सनदी अधिकारी (आयएएस) कमी आहेत. राज्य सेवेतून बढतीवर आयएएसमध्ये पाठविण्यासाठीचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) तीन वर्षांत पाठवलेले नाहीत, त्यामुळे ३९ अधिकारी आयएएस होण्यापासून वंचित राहीले. तर काही अधिकारी वर्षानुवर्षे ठराविक विभागाच्या बाहेर गेलेले नाहीत. या सगळ्यांत प्रशासनाची घडी पुरती विस्कटून गेली आहे.
राज्यात आयएएसच्या ३५0 मंजूर जागा आहेत. त्यापैकी ७0 जागा रिकाम्या आहेत. विशेष म्हणजे या जागा भरल्या जाव्यात म्हणून राज्य-केंद्र स्तरावर नियमित प्रयत्न देखील झाले नाहीत.
राज्य सेवेतून आयएएस करण्यासाठीच्या बैठका २0१२ पासून झालेल्याच नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने यात कसलाही पुढाकार घेतला नाही. पर्यायाने पदोन्नतीची सगळी श्रृंखलाच खंडीत झाली आहे. शिवाय प्रमोटी आयएएस येऊ नयेत यासाठी थेट आयएएस झालेले अधिकार्‍यांचे वेगळेच राजकारण सुरू असते.
बदलीच्या कायद्याला आयएएस लॉबीकडूनच कसा हरताळ फासला जात आहे, याचे अनेक दाखले मंत्रालयात पदोपदी पहावयास मिळत आहेत. अनेक अधिकारी एकाच विभागात दहा ते बारा वर्षे काम करताना दिसत आहेत तर अनेक अधिकारी दीड ते दोन वर्षे प्रभारी म्हणून काम करतानाचे चित्र आहे.
मनुकुमार श्रीवास्तव दहा वर्षांपासून नगरविकास विभागाच्या बाहेर पडलेले नाहीत तर, अजय मेहता २00४पासून उर्जा विभागाच्या बाहेर गेले नाहीत.
हीच अवस्था असिम गुप्ता, एम. श्रीनिवासन, ओ. पी. गुप्ता अशा अनेक अधिकार्‍यांची आहे. नगरविकास, उद्योग असे विभाग सोडण्याची कोणाचीही इच्छा नाही. काही अधिकारी सहकार, कृषी, साखर आयुक्तालयाच्या बाहेर कधी गेलेले नाहीत.
ठराविक खात्यात फिरत राहणार्‍या नावांची यादी देखील मोठी आहे. चांगले काम करणार्‍यांना मात्र दोन वर्षाच्या आत बदलीला सामोरे जावे लागले आहे.
श्रीकर परदेशी यांना पिंपरी चिंचवड येथून, महेश झगडे यांना अन्न व औषधी प्रशासनातून, चंद्रकांत गुडेवार यांना सोलापूरातून बदलले गेले. गुडेवार यांना कोर्टात जाऊन जनतेने सोलापूरात ठेवून घेतले. आर. ए. राजीव यांना दोन तुल्यबळ लॉबीच्या झगड्यात पर्यावरण विभागातून बदलले गेले.
नवे मुख्यमंत्री प्रशासनाला मुक्तपणे काम करू देणार, असे सांगत आहेत. मात्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये झालेली अनियमितता, युपीएससीकडे याद्या न पाठवणे, चांगले काम करणार्‍यांना दुय्यम पदे देणे या सगळ्यांमुळे निर्माण झालेली अनास्था ते कशी दूर करणार हाच खरा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..