Maharashtra TET 2014 Paper Leak?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) दोन्ही पेपर फुटल्याची चर्चा रविवारी परीक्षाथर्र्ींमध्ये होती. परंतु, टीईटी परीक्षेचा एकही पेपर फुटलेला नाही. ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ४ लाख १४ हजार ८१८ उमेदवार टीईटीसाठी प्रविष्ठ झाले होते. राज्यात १ हजार ३६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. ८४६ केंद्रांवर टीईटीचा पेपर-१ आणि ५१६ केंद्रांवर टीईटी पेपर-२ ची परीक्षा झाली.
बीड येथील एका विद्यार्थ्याकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका सापडली असल्याची अफवा उठली. गोंदिया जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राची तपासणी करण्यास गेलेल्या जिल्हाधिकार्यांनी एक विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले.
दोन्ही विद्यार्थ्यांकडे टीईटीची प्रश्नपत्रिका नव्हती तर त्यांनी अंदाजे काही प्रश्नांची उत्तरे लिहून आणली होती. या घटनांमुळे पेपर फुटल्याची अफवा पसरली.
ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तरपत्रिकेची डमिशीट मिळाली त्याची पडताळणी करून पाहिली असता ती मूळ प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांशी जुळत नसल्याचे आढळून आले, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले.
उर्दू भाषेतून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, मागील वर्षी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत उर्दू प्रश्नपत्रिकेची छपाई करताना काही चुका झाल्या होत्या.
उर्दू शब्द लिहिण्यात थोडीही चूक झाली तर विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही. त्यामुळे यंदा परीक्षा परिषदेने हस्तलिखित प्रश्नपत्रिका स्कॅन करून विद्यार्थ्यांना दिल्या, असे असे पायमल म्हणाले.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net