Nagpur University Winter 2014 Examination Results
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे अवघ्या महिनाभरात १८५ निकाल जाहीर झाले आहेत. निकाल घोषित करण्यास विलंब लावण्यात येत असल्याबद्दल राज्यपालांनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्याचाच परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठाकडून ८३५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा आयोजित करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ८४, दुसर्यात ३१३ व तृतीय टप्प्यात २७४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या.
आतापर्यंत पहिल्या टप्प्याचे २१, दुसर्यातील १५६ तर तिसर्या टप्प्यातील ९ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या चौथ्या टप्प्याच्या परीक्षा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत.
दुसर्या टप्प्यातील परीक्षा ११ दिवसांकरिता 'पोस्टपोन' करण्यात आल्या होत्या हे विशेष.
पुढील आठवड्यात आणखी २00 अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्याचे परीक्षा विभागाचे प्रयत्न राहणार आहेत.
या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले आहे अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकार्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित करण्यात विद्यापीठाला ४५ ते १२0 दिवसांचा कालावधी लागला होता. यामुळे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले होते.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net