Adivasi Vikas Vibhag Recruitment Fake Recruitment 2015
आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त, अमरावती कार्यालयाच्या नावे नोकरीचे बनावट आदेशपत्र काढून उमेदवारांच्या फसवणुकीचे प्रकरण पोलिसात दाखल करण्यात आले आहे. आदिवासी विभागाच्या सहायक आयुक्तांनी आवश्यक ती कागदपत्रे पोलीस आयुक्तांकडे सादर केली आहेत. या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? हे पोलीस तपासाअंती उघडकीस येण्याचे संकेत आहेत.
आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त १५७ रिक्त जागांसाठी मागील वर्षी पदभरती प्रक्रिया राबविली गेली. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना एटीसी कार्यालयातून नोकरीचे अधिकृत आदेशपत्र देण्यात आले नाहीत. ज्या पदासाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्या पदांचे नोकरीचे बनावट आदेशपत्र देण्याचा गोरखधंदा मात्र सुरु झाला आहे. बनावट नोकरीचे आदेशपत्र निघत असताना यापासून आदिवासी विकास विभाग अनभिज्ञ होता. निवड झालेल्या काही उमेदवारांनी नोकरीचे बनावट आदेशपत्र एटीसी कार्यालयात आणून दिल्यानंतर संबंधित अधिकार्यांची भंबेरी उडाली. निवड झालेल्या उमेदवारांची केवळ कागदपत्रे तपासणी सुरु असताना हा प्रकार कुणी केला, याची माहिती जाणून घेण्याचे सौजन्यदेखील विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांनी दाखविले नसल्याचे वास्तव आहे.
नोकरीचे बनावट आदेशपत्राद्वारे उमेदवारांच्या फसवणूक होत असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आदिवासी विकास विभाग खडबडून जागा झाला आहे. ''नोकरीच्या बनावट आदेशपत्रासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. प्रकरणाची सत्यता पडताळून हे षड्यंत्र कोणी रचले, त्याकरिता हे प्रकरण पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीचे हे आदेशपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाशी एटीसी कार्यालयाचा काहीही संबंध नाही.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net