Nagpur RTO On-line Appointment Apply, Duration
पक्क्या वाहन परवान्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या 'ऑनलाईन
अपॉईंटमेंट'घेण्यासाठी आता सहा महिन्याचा कालावधी खुला करण्यात आला आहे.
पूर्वी हा कालावधी तीन महिन्यांचा होता. या निर्णयामुळे विशेषत: सप्टेंबर
आणि ऑक्टोंबर या महिन्यात शिकाऊ वाहन परवाना काढलेल्यांना याचा फायदा होणार
आहे.
विदर्भ मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या पदाधिकार्यांनी
परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्याशी भेट घेऊन शिकाऊ व पक्क्या परवान्याच्या
अपॉईंटमेंटच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी पक्क्या वाहन
परवान्याच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
या
बैठकीत, ज्या दिवशीची अपॉईंटमेन्ट असेल त्याच दिवशी त्याची चाचणी घेण्याचे,
यासाठी मोटार वाहन निरीक्षकाने जास्तीचा वेळ देण्याच्या सूचनाही केल्या
आहेत. विशेषत: कार्यालयीन अडचणीतून उमेदवाराची चाचणी घेणे शक्य न झाल्यास
त्यास पुढील कामाच्या दिवशी पुन्हा नवीन अपॉईंटमेंटचा आग्रह न धरता
चाचणीसाठी स्वीकारावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र,
अपॉईंटमेंटच्या दिवशी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास ही सुविधा मिळणार
नाही. परवानाधारकाला आपल्या परवान्यावर अधिक वाहनवर्ग नोंदविण्यासाठी
अपॉईंटमेंटची गरज राहणार नाही, याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याकडे
कार्यालय प्रमुखाने वैयक्तिक लक्ष द्यावे, अशा सूचनाही झगडे यांनी दिल्या
आहेत.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net