RTE Admission 2015 Date Extended
शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार मोफत शाळा प्रवेशाची प्रक्रिया २७फेब्रुवारीपासून सुरूकेली होती. परंतु शहर व जिल्ह्यातील ४७शाळांची अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला २ ते १७ मार्च 2015 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- Maharashtra RTE Admission 2015 List of Required Documents
- RTE Maharashtra 2015 Application Form Apply Online
वंचित घटकातील बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी व पहिल्या ईयत्तेमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के कोट्यामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो.यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरावे लागतात.राज्यात ही प्रक्रिया २७फेब्रुवारी ते ११मार्च 2015 दरम्यान राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते.जिल्ह्यात या २५ टक्के शाळा प्रवेशासाठी २१७शाळा आहेत.यामध्ये १0२शहरात व ९२ शाळा ह्या ग्रामीण भागातील आहेत.यात काही माध्यमिक शाळांचादेखील समावेश आहे.मात्र ४५शाळांनी २५ टक्के शाळा प्रवेशासाठी नोंदणी केली नसल्याने ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आहे.या शाळांची नोंदणी नसल्याने ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत या शाळा पालकांना दिसणार नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला २ ते १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net