SSC, HSC Scholarship 2015 Application Form, Website Now Working
सामाजिक न्यायविभागाने बीएड, एमएड, शारीरिक शिक्षणसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कुठलेही "ऑप्शन‘ या संकेतस्थळावर उपलब्धच नाही. दुसरीकडे 10 फेब्रुवारीपासून संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत.
सामाजिक
न्यायविभागाद्वारे ज्या अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती द्यायची आहे, त्या
विषयाची नोंद विभागाच्या संकेतस्थळावरील यादीत केली जाते. मात्र,
संकेतस्थळावर इतर मागासगर्वीय, भटक्या व विमुक्त जाती आणि विशेष मागास
प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लॉगीन केल्यावर त्यांच्यासाठी विधी, वाणिज्य
शाखेतील काही अभ्यासक्रम, एमएड, बीएड, शारीरिक शिक्षण, सेमिकल्चर आणि इतर
अभ्यासक्रमांचे नावच नसल्याचे आढळून आले. यासंदर्भात विद्यापीठाकडून
यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे संपर्क साधण्यात आला. त्यावेळी
विभागाने याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. शिवाय त्याबाबत पुढल्या
महिन्यात निर्णय येईल, असेही स्पष्ट केले. यानंतर शिष्यवृत्तीचे अर्ज
भरण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली. मात्र, संकेतस्थळ अतिशय स्लो आणि त्यात
हे विषयच नमूद नसल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा कसा, हा प्रश्न
निर्माण झाला. त्यामुळे विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांपासून
मंत्र्यांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली. याबाबत विद्यापीठानेही चार वेळा
संचालकांपासून कारकुनार्यंत मेल केले. मात्र, परिस्थिती "जैसे थे‘च राहिली.
याउलट सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विद्यापीठाच्या माथ्यावर
दोष मारून वेळ मारून नेली. आता विद्यापीठातील हजारो विद्यार्थी
शिष्यवृत्तीचे अर्जच भरू शकले नाही. एकीकडे शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणार
नाही, अशा घोषणा मुख्यमंत्री देत असताना, दुसरीकडे मात्र अर्ज भरण्यापासूनच
विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे काम शासन करीत आहेत.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे विद्यार्थीही वंचित
राज्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनाही संकेतस्थळ बंद असल्याने अर्ज भरता आले नाही. यामुळे ओबीसीसह भटक्या, विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. आतापर्यंत विभागातील चाळीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जच भरले नाही.
शिष्यवृत्तीचा प्रश्न घेऊन अनेकदा कारकून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनाच निवेदन देत, माहिती दिली. मात्र शासन आणि प्रशासन दोन्ही त्याबाबत उदासीन असल्याचे दिसते. विद्यापीठाने तत्परता दाखवून चारदा मेलही केले तरीही कुठल्याच प्रकारची सुधारणा नसल्याचे दिसते.

1 comment:
My results
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net