ST Mandal Driver Bharti 2015 Application Form Details
Maharashtra ST Mahamandal Bharti 2015 details
एसटीत चालक पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत आतापर्यंत सात हजारांहून अधिक ऑनलाइन अर्ज एसटीकडे दाखल झाले आहेत. केवळ तीन दिवसांत हे अर्ज दाखल झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
एसटी महामंडळात सध्या ३६ हजार चालक असून त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे ७ हजार ८00 चालकांची भरती एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. १६ फेब्रुवारीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून २४ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. चालकभरतीबरोबरच यामध्ये चालक कम वाहक अशा नव्या पदाचाही समावेश आहे. लेखी परीक्षा, त्यानंतर कागदपत्र तपासणी आणि वाहन चाचणी घेतल्यानंतरच हे चालक एसटीत दाखल होतील, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
१६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अर्जप्रक्रियेत १७, १९ व २२ फेब्रुवारी 2015 हे सुट्टीचे दिवस आल्याने त्या दिवशी एकही अर्ज स्वीकारण्यात आला नाही. आता येत्या आठवड्यात सुट्टी नसल्याने मोठय़ा प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता एसटी महामंडळातील अधिकार्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
परंतु, मागील वर्षीच्या भरतीतील चालक अजूनही प्रतीक्षा यादीत असूनही त्यांचा या नव्या भरतीत विचार का होत नाही, असा सवाल मात्र उपस्थित होत आहे. पदासाठी असलेल्या अटी
- ■ दहावी उत्तीर्ण
- ■ मराठी भाषेत लिहिता - वाचता यावे
- ■ वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव
- ■ अवजड वाहन चालविण्याचा परवाना
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net