Maharashtra RTE Admission 2015 Last Date Extended
RTE Admission 2015 Details & Last Date details are given below in Marathi.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार २५ टक्के आरक्षणातील प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदाच अमरावतीसह सर्व जिल्ह्यांत तथा महापालिकांच्या हद्दीत ऑनलाईन पद्धतीने राबविली गेली. यामध्ये पुणे, मुंबई या शहरांचा समावेश होता. मात्र यंदापासून ही पद्धत सर्वत्र लागू झाल्याने ऑनलाईन प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८५शाळांत दोन हजार २५0विद्यार्थ्यांना नर्सरी ते पहिल्या वर्गापर्यंत प्रवेश मोफत मिळणार आहे.
ही प्रक्रिया २ मार्चपासून १९ केंद्रांवर सुरूझाली.आता २५ टक्क्यांच्या ऑनलाईन प्रवेशासाठी १४मार्च शनिवार हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता.मात्र आता या प्रक्रियेला २0मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील ८७ शाळा आहेत.ग्रामीण भागात यासाठी १९मदतकेंद्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुरूकेले आहेत.ऑनलाईन प्रवेशासाठी दिलेल्या संकेत स्थळावर प्रवेशासाठी पात्र असणार्या पाल्यांच्या पालकांनी लॉगीन करणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया सर्व शिक्षा अभियानाशी संलग्नीत करण्यात आली असून गर्ल्स हायस्कूलमधील सर्वशिक्षा अभियानाच्या कार्यालयात संबंधित पालकांनी ऑनलाईन अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रति प्राथमिक शिक्षण विभागात सादर करणे बंधनकारक आहे. २0 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आता ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येतील. त्यानंतर मात्र ऑनलाईन प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे.२५ टक्के आरक्षित प्रवेश पात्र ठरणार्या नर्सरी केजी वन, केजी टू या तुकड्यासाठी पाल्यांच्या ठरवून दिलेल्या वयाच्या निकषाप्रमाणे होणार असल्याचे शिक्षण विभागाचे सूत्रांनी सांगितले.
तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्चदर्जाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा व त्यांच्या वाट्याला देखील दर्जेदार शिक्षण यावे, या दृष्टीने ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शाळा प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी या प्रक्रियेला शिक्षण विभागाकडूून मुदतवाढ देण्यात आली असून आता २0 मार्च पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया मागील दोन आठवड्यांपासून सुरू आहे.या प्रक्रियेला पालकांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला २0मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने पालकांची मोठीच सोय झाली आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net