Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, March 3, 2015

RTE Admission 2015 Last Date 17 March 2015, Help Centre

RTE Admission 2015 Last Date 17 March 2015, Help Centre

शिक्षण हक्क कायदा (आरटीई)२00९ नुसार पात्र शाळेत मागासवर्गीय व गरीब विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. नागपूर शहरात २ ते १७ मार्च २0१५ दरम्यान ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे व मनपाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने महाल येथील टाऊ न हॉल येथे सोमवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आरक्षणासंदर्भात शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांनी सादरीकरण केले. यासाठी २५ मदत केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, १९0४ प्रवेश अर्ज आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेला सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, प्रभारी जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, क्रीडा समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, सुनील अग्रवाल, संजय महाकाळकर, सुरेश जग्यासी, वासुदेव ढोके, महेंद्र राऊ त, मनीषा घोडेस्वार, शीतल घरत आदी उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकातील बालकांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यादृष्टीने हा कायदा करण्यात आला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन पंजाबराव वानखेडे यांनी केले. प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बालकाचे छायाचित्र आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली.(प्रतिनिधी) १९0४ अर्ज आले : मदत केंद्रांची स्थापना करणार

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..