Nagpur Sarthi Appointment New System 2015
RTO प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध, सुनियोजित पद्धतीने व उमेदवारांच्या सोयीचे व्हावे म्हणून राज्यभरात पक्क्या वाहन परवान्यासाठी 'ऑनलाईन अपॉईंटमेंट' योजना सुरू केली. १७ सप्टेंबर २0१४ पासून शिकाऊ परवान्यासाठी तर १ डिसेंबर २0१४ पासून पक्क्या परवान्यासाठी या योजनेची सक्ती करण्यात आली. पूर्व आरटीओमध्ये लर्निंग लायसन्ससाठी दर दिवशी पूर्वी १२0 ऑनलाईन अपॉईंटमेंट तर परमनंट लायसन्ससाठी ११0 अपॉईंटमेंट घेण्याची सोय होती. परंतु परवान्यांसाठी उमेदवारांची संख्या वाढल्याने परमनंट लायसन्सच्या अपाईंटमेंट तब्बल पाच महिने म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत फुल्ल झाल्या होत्या. मार्च किंवा त्या पूर्वी ज्यांनी लर्निंग लायसन्स काढले त्यांच्यावर पुन्हा लर्निंग लायसन्स काढण्याची वेळ आली होती.
तर, लर्निंग लायसन्सच्या अपॉईंटमेंटसाठी महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागायची. मोटार वाहन निरीक्षकांच्या तोकड्या संख्येमुळे ऑनलाईन अपॉईन्टमेंटचा कोटा सरसकट वाढविणे अशक्य होते. यावर उपाय म्हणून अपॉईंटमेन्टमधील अपंगांसाठी असलेले राखीव कोटा कमी केला आणि सामान्य वाहनधारकांच्या कोट्यात वाढ केली.(प्रतिनिधी) लर्निंगसाठी लायसन्ससाठी ४0 तर
परमनंटसाठी २६ ने वाढ
■ लर्निंग लायसन्सच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी पूर्वी दरदिवसांचा १२0चा कोटा होता आता तो ४0 ने वाढवून १६0 करण्यात आला आहे. परमनंट लायसन्सच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी पूर्वी ११0चा कोटा होता तो आता २६ ने वाढवून १३६ करण्यात आला आहे. यामुळे पूर्वी लर्निंग लायसन्साठी महिन्याभरानंतर मिळणारी अपॉईंटमेंट आता चार दिवसांवर तर परमनंट लायसन्ससाठी पूर्वी तीन महिन्यानंतर मिळणारी अपॉईंटमेंट आता महिन्यावर आली आहे.
अपंगांसाठी अपॉईंटमेंटची गरज नाही
■ लर्निंग व परमनंट लायसन्ससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटची सक्ती आहे. परंतु पूर्व आरटीओ कार्यालयाने यात बदल केले आहे. अपंगांच्या नावाने असलेला अपॉईंटमेंटचा कोटा सामान्य वाहनधारकांना वाढवून दिला आहे. यामुळे आता अपंगांना अपॉईंटमेंटची गरज राहणार नाही. ते कार्यालयात आल्यास त्यांचे थेट लायसन्स काढून देण्यात येईल, अशी माहिती पूर्व आरटीओने दिली आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net