Maharashtra SSC Supplementary Reexamination 2015 Timetable
Maharashtra SSC Supplementary Reexamination 2015 Timetable & Examination details are given below in Marathi.दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत फेरपरीक्षा सलग घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून दहावीची ऑक्टोबरमध्ये होणारी फेरपरीक्षा जुलैमध्येच घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला. त्यांच्या आदेशाने मंडळाने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
या परीक्षेची सुरुवात २१ जुलैपासून होणार असून, पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर असणार आहे. सकाळी साडेदहा ते दीड या वेळेत मराठी आणि अन्य प्रथम भाषांचा पेपर होणार आहे, तर दुसर्या दिवशी द्वितीय वा तृतीय भाषेचा पेपर होणार आहे.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, २३ जुलै रोजी इंग्रजीचा पेपर, २४ जुलै रोजी बीजगणित, तर २५ जुलै रोजी भूमितीचा पेपर आहे. २८ जुलै रोजी विज्ञान, तर २९ जुलै रोजी सामाजिक शास्त्र, ३0 जुलै रोजी सामाजिक शास्त्र भाग २ हा पेपर होणार आहे, तर ५ ऑगस्ट रोजी माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होणार आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net