Nagpur University B.Sc. First Sem Winter 2015 Paper Leak ?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीएससी प्रथम वर्ष प्राणीशास्त्र विभागाच्या प्रथम सत्राचा पेपर फुटल्याचे शुक्रवारी सिद्ध झाले आहे. हे कृत्य विद्यापीठात सक्रिय असलेल्या एका टोळीने केल्याचे उघड झाले आहे. परीक्षेच्या काही दिवसापूर्वी टोळीच्या हाती पेपर लागला होता. या प्रकरणावर विद्यापीठातील अधिकारी चुप्पी साधून आहे. परंतु लोकमतला २९ नोव्हेंबरलाच टोळीकडूनच पेपरमध्ये येणारे प्रश्न कागदावर लिहून मिळाले होते. हेच प्रश्न शुक्रवारी सकाळी बीएससी प्रथम सेमिस्टरची मूळ प्रश्नपत्रिका. जी शुक्रवारी परीक्षार्थींना देण्यात आली. पर्यवेक्षक नियुक्त झालाच कसा? ■ शुक्रवारी सकाळी ९.३0 वाजता पेपर होता. एका केंद्रावर टोळीतील एक सदस्यच पर्यवेक्षकाचे कार्य करताना दिसून आला. त्याने पेपरसाठी पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची सुट दिली होती. या पर्यवेक्षकाला कुणी नियुक्त केले होते. त्याला हे काम सोपविण्यापूर्वी त्याची चौकशी का करण्यात आली नाही, यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net