Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, February 17, 2016

Nagpur University Summer 2016 Examination May Postpone?

Nagpur University Summer 2016 Examination May Postpone?


RTM Nagpur University Summer 2016 examinations may be postpone. The news is published in local news papers about the Summer 2016 Examination of BA, BCom, BSc, BCA, BBA, MBA, MCA & other courses. For all details read given news. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेले आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. परंतु दुसर्‍या टप्प्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकाची घोषणा मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच केली होती. पहिल्या टप्प्याला ५ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
यात प्रामुख्याने पदविका व प्रमाणपत्र परीक्षांचा समावेश आहे. याचे वेळापत्रक जाहीर झाले. संभाव्य वेळापत्रकानुसार दुसर्‍या टप्प्याच्या परीक्षांना १५ मार्चपासून सुरुवात होईल. यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रथम तसेच अंतिम वर्षातील पदवी परीक्षा घेण्यात येतील.
परंतु अद्यापपर्यंत कला शाखेचे काही निकाल लागायचे आहेत. अशास्थितीत १५ मार्चपासून त्या परीक्षा सुरू होणे अशक्य आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यातील काही परीक्षा ८ ते १0 दिवसांसाठी समोर ढकलण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत परीक्षा विभागातील अधिकार्‍यांची बैठक झाली आहे.
लवकरच येणार वेळापत्रक
कला शाखेतील काही परीक्षांचे निकाल बाकी आहेत, हे खरे आहे. परंतु हे निकाल या आठवड्यातच जाहीर करण्यात येतील व विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येतील. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यातील या परीक्षा ८ ते १0 दिवस समोर ढकलण्यात येऊ शकतात. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 
लवकरच सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..